कळंब (प्रतिनिधी) -
सामाजिक बांधीलकीची जाणीव ठेवून अनेक नागरिक, रोटरी क्लब सारख्या संस्था विविध माध्यमातून मदत करत असून अश्या सर्वांच्या सहकार्याने कोरोनाशी सामना सुरु आहे, असे मत डॉ.जीवन वायदंडे यांनी व्यक्त केले.
रोटरी क्लब ऑफ कळंब तर्फे आज उपजिल्हा रुग्णालय कळंब येथे कोरोना ची तपासणी करणाऱ्या रुग्णालयांना स्वॅब टेस्टींग बूथ प्रदान करण्यात आले त्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी रोटरी क्लब चे अध्यक्ष रो.हर्षद अंबुरे सचिव प्रा.डॉ. हनुमंत चौधरी.प्रो.चेअरमन रो.गणेश डोंगरे रो. संजय देवडा,रो.संजय घुले रो.डॉ. गिरीष कुलकर्णी. रो.डॉ. अभिजीत जाधवर उपस्थित होते. सध्याच्या परिस्थितीत आपले डॉक्टर्स नर्सेस व तंत्रज्ञ अतिशय उत्तम काम करत असून त्यांना आवश्यक असलेले साहित्य पुरविणे व त्यांच्या प्रकृतीची काळजी घेणे हे आपल्या सर्वांचेच कर्तव्य असून मदतीसाठी अनेक हात पुढे येत आहेत ही कौतुकास्पद आणि कळंब शहराच्या लौकिकाला साजेशी बाब आहे असेही डॉ. जीवन वायदंडे म्हणाले.
कोरोना बाधित रुग्णांची तपासणी करताना डॉक्टर नर्स वा तंत्रज्ञ यांचा रुग्णाशी खूप जवळून संपर्क येतो आणि त्यातून त्यांना संसर्ग होण्याची शक्यता असते. यासाठी केरळ मधे सर्वप्रथम स्वॅब टेस्टींग बूथ (Kiosk) ची कल्पना सोशल मीडिया वर बघितली आणि मग आपल्या कळंब मध्ये ही हे प्रत्यक्षात आणण्याचे ठरविले व त्यानुसारच असे बूथ बनवून घेतले व आज उपजिल्हा रुग्णालयात हे प्रदान करताना मी माझे कर्तव्य केल्याची भावना आहे असेही त्यांनी सांगितले.या बूथ मुळे तपासणी करणाऱ्या तंत्रज्ञ आणि रुग्णामधे सुरक्षित अंतर राहील व त्यामुळे रुग्णाच्या शिंकण्याचा किंवा खोकण्याचा थेट परिणाम होणार नाही यासाठी हे महत्त्वाचे असल्याचे ही रो.हर्षद अंबुरे म्हणाले.
सद्यस्थितीत अन पण अश्या अनेक कल्पना निरुपयोगी आणि नागरिकांसाठी घातक ठरण्याची शक्यता असल्याने अतिशय विचारपूर्वक प्रशासनाला सहकार्य करुन ही लढाई आपल्याला जिंकायची आहे असे ही हर्षद अंबुरे म्हणाले.सरकारने निर्धारित केलेल्या सर्व केंद्रात हे Kiosk (खोपटे ,बूथ ,केबिन ) बसविण्यात येत आहेत व याद्वारे पी पीई किट चा खर्च वाचेलच पण त्यासह जादा संशयित रुग्णांची तपासणी होवू शकेल असेही रो.हर्षद अंबुरे म्हणाले. या प्रोजेक्ट साठी रो. अरविंद शिंदे सर वैजनाथ पकवे.निखील भंडगे,रवि नारकर, सुशीलकुमार तीर्थकर,विश्वजीत ठोंबरे, डॉ. अमीत पाटील यांचे सहकार्य लाभले.