उस्मानाबाद/प्रतिनिधी -
राज्यातील कोविंड 19 महामारी नियंत्रित करण्यासाठी राज्य सरकारने 22/3/ 2020 पासून लॉक डाऊन जाहीर केला ज्यामुळे राज्यातील सर्व उद्योग व्यवसाय बंद पडले ,त्यानंतर केंद्र सरकारने 14 एप्रिल पर्यंत मुदतवाढ दिली ,त्यानंतर ती 3 मेपर्यंत आणि 17 मे पर्यंत वाढविण्यात आली आहे .आत्ताची परिस्थिती पाहता ती आणखी वाढण्याची शक्यता आहे .लॉक डॉन मुळे राज्यातील सर्व उद्योग व्यवसाय अपवाद वगळता आजही बंद आहेत. असंख्य व्यावहारिक अडचणीमुळे बहुसंख्य उद्योग व्यवसाय अनिश्चित काळासाठी बंद राहू शकतात अशी सद्यस्थिती आहे .परिणामी राज्यातील गरीब ,कष्टकरी ,रोजच्या कामावर जगणारी व दारिद्र्य रेषेखालील जनता यांचे जगणेही आता दुरापास्त होऊ लागले आहे ,अशा परिस्थितीत राज्यातील या गरीब कुटुंबांना मदतीचा हात देणे व हा कठीण काळ काहीप्रमाणात सुकर करणे ही आता राज्य सरकारची जबाबदारी आहे आणि त्यासाठी राज्य सरकारने तातडीने काही अत्यावश्यक निर्णय घेणे आवश्यक आहे .दिल्ली ,कर्नाटक ,आंध्र इत्यादी काही राज्य शासनांनी काही बाबतीत निर्णय घेतले आहेत ,ते ध्यानी घेऊन व राज्यातील सद्यस्थिती ध्यानी घेऊन राज्य सरकारने मदत करण्याचे त्वरित निर्णय घेण्याची जनता दल सेक्युलर चे प्रदेश कार्याध्यक्ष तथा  ॲड रेवण भोसले यांनी केली आहे.
       राज्यातील सर्व बांधकाम कामगार यांना 5000 हजार रुपये ,सर्व रिक्षा व टॅक्सीचालक यांना 5000 रुपये , सर्व धोबी व सलून चालक यांना 5000 रुपये , सर्व हातमाग विणकर यांना 5000 रुपये ,फेरीवाले हातगाडीवाले व तत्सम छोट्या विक्रेत्यांना 5000 रुपये मदत देण्यात यावी ,या व्यतिरिक्त राज्यातील दारिद्र्य रेषेखालील सर्व कुटुंबांना 5000 रुपये मदत देण्यात यावी ,राज्यातील फुले, भाजीपाला ,दूध व फळे इत्यादी नाशिवंत माल उत्पादक सर्व शेतकरी यांचे संपूर्ण वा बहुतांशी उत्पादन वाया गेले आहे ,या सर्व शेतकरी उत्पादकांना 25000 हजार रुपये प्रतिहेक्टरमदत देण्यात यावी,  सर्व सूक्ष्म लघु व मध्यम उद्योग यांचे किमान दोन महिने व संपूर्ण बंद कालावधीचे वीज बिल संपूर्णपणे माफ करण्यात यावे ,ही वेळ राज्य सरकारचे उत्पन्न आर्थिक अडचणी इत्यादी बाबीचा विचार करत बसण्याची नाही तर धाडसाने निर्णय घेण्याची आहे. आज माणूस जगवणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे 15 व्या शतकात दामाजीपंतांनी गोदामे खुली केली होती, त्या पद्धतीने सरकारने विचार करावा आणि जनतेला जगवावे असे आवाहनही ॲड भोसले यांनी केले आहे.
 
Top