उस्मानाबाद/प्रतिनिधी - 
उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना-महाराष्ट्र अंतर्गत कोवीड-19 च्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात मजुरांना कामे उपलब्ध करुन देण्यासाठी जिल्ह्यातील एकूण 621 ग्रामपंचायत पैकी 374 ग्रामपंचायती मध्ये कामे सुरु असून या कामांवर एकूण 781 हजेरी पत्रके निर्गमित केली आहेत. या कामांवर एकूण 6 हजार 592 मजुरांची उपस्थिती आहे.
 या कामांमध्ये ग्रामपंचायत अंतर्गत एकूण 610 कामे सुरु आहेत. यामध्ये कृषि विभागाची -65, सामाजिक वनीकरण-35, वनविभागाची -06, रेशीम विभागाची -54 व जलसंधारण विभागामार्फत-11 कामे सुरु आहेत. या कामामध्ये घरकुलाची 109 कामे, वैयक्तिक सिंचन विहिरी - 170, सार्वजनिक पाणीपुरवठा विहिर-283, तुती लागवड-54, फळबाग लागवड - 50, वृक्ष लागवड -36, गाळ काढणे -11 व इतर कामे मनरेगा अंतर्गत सुरु असून जिल्ह्यामध्ये मजुरांच्या मागणीप्रमाणे मजुरांना कामे तात्काळ उपलब्ध करुन देण्याची दक्षता घेण्यात येत आहे. वाशी तालुक्यातील डोंगरेवाडी ग्रामपंचायतीमध्ये पाझर तलावातील गाळ काढण्याचे काम सुरु असून, कोवीड-19 चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कामावर हँडसॅनिटायझर, साबन, मास्क इत्यादी साहित्य मजुरांना उपलब्ध करुन दिले असून सामाजिक अंतरा (Social Distance) चे काटेकोरपणे पालन करण्यात येत आहे.

 
Top