लोहारा/प्रतिनिधी
कोरोना या संसर्गजन्य रोगाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनमुळे  निराधार, मजूर, हातावर पोट असणाऱ्या, विधवा, परित्यक्ता आणि घरामध्ये अडकून राहिलेल्या गोरगरीब गरजू कुटुबांना
 भाजपा प्रदेश सरचिटणीस आ.सुजितसिंह ठाकूर , आ.राणाजगजितसिंह पाटील, भाजपा जिल्हाध्यक्ष नितीन काळे, भाजपा माजी जिल्हाध्यक्ष दत्ता भाऊ  कुलकर्णी, यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय जनता पार्टी लाेहारा तालुका यांच्यावतीने लोहारा शहरात व तालुक्यात सोशल डिस्टेन्स राखत अन्नधान्य व किराणा  किट, साहित्याचे  व मास्क, सेनिटायझर चे वाटप भाजपा जिल्हाध्यक्ष नितीन काळे व भाजपा तालुकाध्यक्ष राजेंद्र पाटील यांच्या हस्ते वाटप करण्यात आले. यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष नितीन काळे, भाजपा तालुकाध्यक्ष राजेंद्र पाटील, माजी तालुकाध्यक्ष विक्रांत संगशेट्टी, तालुका सरचिटणीस शिवशंकर हत्तरगे, ओबीसी तालुकाध्यक्ष दगडु  तिकडे, उपस्थित होते.
 
Top