उस्मानाबाद /प्रतिनिधी-
कोरोनाच्या विश्वव्यापी संकटामुळे जगातील सर्वच क्षेत्र ठप्प पडली आहेत.याचा मोठा फटका विध्यार्थी व शिक्षणक्षेत्रावरहि नक्किच होत आहे.हि बाब लक्षात घेउन विध्यार्थी हितासाठि कायम धडपड करत असलेल्या युवासेनेने  राज्याचे कॅबिनेट मंत्रि तथा युवासेनाप्रमुख अॅड.आदित्य ठाकरे यांच्या माध्यमातुन युवासेनेचे सचिव वरुण सरदेसाई यांनी युवासेना काॅलेज कक्ष द्वारे महाराष्ट्रातील १० वी आणि १२ वी च्या विध्यार्थ्यांच्या सोयीसाठि डिजिटल ( PDF ) स्वरूपात पुस्तके उपलब्ध करून देण्याची व्यवस्था केली आहे.
 विद्यार्थ्यांना अभ्यासात कुठेही अडचण येऊ नये म्हणून ही सुविधा विनामूल्य उपलब्ध केली आहे. तेंव्हा ज्यांना पुस्तके हवी असतील त्यांनी 9822472251, 9552366777, 9921876700  या WhatsApp नंबर वरती संपर्क साधुन उपलब्ध करुन घेऊ शकता, असे आवाहन युवासेनेचे जिल्हा समन्वयक अॅड.संजय भोरे यांनी केले आहे.

 
Top