उस्मानाबाद/प्रतिनिधी-
स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची 128 वी जयंती जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात साजरी करण्यात आली.
जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा अस्मिता कांबळे, जिल्हा परिषदेचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. संजय तुबाकले,पंचायत विभागाचे अधिकारी आर. व्ही.पिंगळे यांनी स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून प्रतिमेस पुष्पहार अर्पण केला.
जिल्हा परिषदेतील सहाय्यक अधिकारी मधुकर कांबळे,शैलेश घुटे यांच्यासह कर्मचारी  उपस्थित होते.
 
Top