उस्मानाबाद/प्रतिनीधी
उस्मानाबाद जिल्ह्यातील खरेदी केंद्रावर प्रचंड मोठ्या प्रमाणात हरभाऱ्यांची नोंद झालेली आहे. संपुर्ण हरभाऱ्यांची खरेदी होत नसल्याने लक्षात आल्यावर उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघाचे खासदार ओमराजे निंबाळकर व शिवसेना जिल्हाप्रमुख तथा आ कैलास घाडगे-पाटील यांनी DDR, सर्व हरभरा खरेदी केंद्र चालक यांची बैठक घेतली.
यावेळी संपूर्ण केंद्र चालकांना ग्रेडर वाढवावेत, मनुष्यबळ वाढवून खरेदी पूर्ण करावी. तसेच ज्या केंद्र चालकांकडे जास्त ऑनलाइन नोंद झालेली आहे. अशा केंद्र चालकांनी विभागणी करून हरभरा खरेदी कराव्यात खासदार साहेबांनी सूचना केल्या. खरेदी केंद्रावर नोंद झालेला संपुर्ण हरभऱ्यांची शासनाच्या हमी भावाप्रमाणे खरेदी करावी. तसेच एक हि नोंदणी केलेला शेतकरी हरभरा खरेदी पासून वंचित राहणार नाही याची सर्व शासकीय अधिकारी, केंद्र चालक यांनी दक्षता घ्यावी.
याबैठकीस DDR श्री. देशमुख, कळंबचे कट्टकझोन, उस्मानाबादचे श्री. गायकवाड, सर्व हरभरा खरेदी केंद्र चालक उपस्थित होते.

 
Top