उस्मानाबाद/प्रतिनिधी-
 कोरोना महामारीच्या संकटात जिल्हयातील गोर-गरिब जनतेची उपासमार होवू नये, यासाठी राज्याचे जलसंधारण मंत्री तथा जिल्हयाचे पालकमंत्री शंकरराव गडाख यांनी तब्बल १० हजार कीट देवून मोठा दिलासा दिला. तसेच दारोदारी जावून वाचकांपर्यंत पेपर पोहचविण्याचे काम करणाऱ्या वृत्तपत्र व्रिकेत्यांनाही ३५० किटचे वाटप करण्यात आले. याबद्दल पत्रकार व जिल्हयातील जनतेच्या वतीने पालकमंत्र्यांचे आभार पत्र व पुष्पगुच्छ देऊन ऋण व्यक्त करण्यात आले.
कोरोनामुळे हातावर पोट असलेल्या अनेकांचा रोजगारही बुडाला आहे. कामच नसल्याने दामही नाही. त्यामुळे दोनवेळच्या जेवणाचेही वांदे झाले. प्रशासनाकडूनही अन्नधान्य पुरविणे शक्य होत नव्हते. त्यामुळे पालकमंत्री शंकरराव गडाख यांनी जिल्हयासाठी तब्बल १० हजार कीट देऊन त्याचे प्रशासनामार्फत वाटप केले. तसेच जिल्हयातील वृत्तपत्र विक्रेत्यांचीही उपासमार होत असून त्यांनाही जीवनावश्यक किटचे वाटप करण्यात यावे, अशी मागणी जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या वतीने करण्यात आली होती. याची दखल घेवून जिल्हा प्रशासनाच्या वतीने वृत्तपत्र विक्रेत्यांनाही ३५० किटचेही वाटप करण्यात आले. याबद्दल पत्रकार संघ व जिल्’ातील जनतेच्या वतीने पत्रकार संघाचे अध्यक्ष धनंजय रणदिवे, सरचिटणीस संतोष जाधव, चंद्रसेन देशमुख, सयाजी शेळके आदींनी आभार पत्र व पुष्पगुच्छ देऊन ऋण व्यक्त केले.
 
Top