परंडा प्रतिनिधी
परंडा येथील विविध सामाजिक उपक्रम राबविणाऱ्या आधार सामाजिक संस्थेच्या वतीने दि.१ मे रोजी “परंडा शहरातील सर्व नागरिकांची थर्मल स्कॅनिंग  करावी” अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली होती.तसेच मागणीचे निवेदन सोशल मिडियावर टाकण्यात आले होते.
या मागणीची दखल घेत कार्यतत्पर नगराध्यक्ष जाकीर सौदागर यांनी घेऊन   दि.३ मे पासून परंडा शहरातील सर्व नागरिकांच्या थर्मल स्कॅनिंग द्वारे तपासणीला सुरुवात करण्यात आली आहे.
पालिकेच्या वतीने चार स्कॅनिंग द्वारे शहरातील चार प्रभागात ही तपासणी मोहीम राबविण्यात येत आहे.पालिकेचे कर्मचारी घरोघरी जाऊन तपासणी करीत आहेत. तरी शहरातील नागरिकांनी निःसंकोचपणे तपासणी करुन घेऊन पालिका कर्मचाऱ्यांना सहकार्य करावे,असे आवाहन “आधार सामाजिक संस्थेच्या वतीने करण्यात येत आहे.
 
Top