तुळजापूर / प्रतिनिधी
देशासह महाराष्ट्र राज्यात कोरोना सारख्या महाभयंकर जिवघेण्या विषाणुचा फैलाव जोरात सुरु आहे. कोरोनाच्या संकटाचा सामना महाराष्ट्रातील नागरिक करत आहेत. कोरोना आपत्ती काळात महाराष्ट्र सरकारने जनता कर्फ्यू व लॉकडाऊन सारखे अनेक चांगले मोठे निर्णय घेतले असून त्याचा परिणाम गोरगरिब जनतेवर पडला आहे हतावर पोट असणाऱ्या नागरीकांना प्रभाग क्रमांक ७ चर्मकार गल्ली व घाटशिळ रोड प्रभागात माजी नगराध्यक्ष व चालु नगरसेविका भारतीताई नारायणराजे गवळी यांच्या वतीने १५१ कुटुंबांना घरपोच किरण वाटप करण्यात आला.
कै.नारायणराजे गवळी हे तुळजापूर शहरातील गोरगरीब गरजू नागरिकांना सतत मदत करत होते. उन्हाळा दिवसात गल्ली बोळात पाणपोई उभारत हाते  त्यांचाच वारसा नगरसेविका भारतीताई गवळी यांनी पुढे सुरू ठेवला आहे.

 
Top