उस्मानाबाद/प्रतिनिधी-
 बेंबळी विकास चर्चा या फेसबुक पेजवर आज रविवारी (दि. २४) रात्री आठ वाजता वैद्यकीय अधिकारी डॉ. अमोल सूर्यवंशी व डॉ. रोहित राठोड लाईव्ह येऊन कोरोना आजारासंदर्भात मार्गदर्शन करणार आहेत. यामध्ये बेंबळीतील सर्व नागरिकांनी सहभागी होण्याचे आवाहन अॅडमिन पॅनलच्या वतीने करण्यात आले आहे.
बेंबळी विकास चर्चा फेसबुक लाईव्हमध्ये गुरूवारी ॲड. उपेंद्र कटके यांनी केलेल्या यशस्वीपूर्ण मार्गदर्शन केले होते. आता रविवारी रात्री आठ वाजता  covid-19 याबाबत आरोग्यविषयक घ्यावयाची काळजी, कुटुंबाला सुरक्षित ठेवण्याची जबाबदारी, सामाजिक अंतर,क्वारंनटाइन काळात घ्यावयाची दक्षता,  मास्क आणि सैनी टायझर का वापरावे, आजाराची लक्षणे आणि उपचार, प्राथमिक आरोग्य केंद्राची आरोग्यविषयक जबाबदारी. अशा विविध पैलूंवर मार्गदर्शन करण्याकरिता डॉ. सूर्यवंशी व डॉ. राठोड सर लाईव्ह येणार आहेत. यावेळी वैद्यकीयस्तरावरची कोणतेही प्रश्न नागरिकांना विचारता येणार आहेत. मात्र, यामध्ये गावातील व्यवस्था, कक्षाची परिस्थिती यासंदर्भात कोणीही प्रश्न विचारू नयेत. केवळ वैद्यकीय, उपचार, काळजी यांसदर्भातील प्रश्न विचारण्यासाठी मुभा असणार आहे.  या कार्यक्रमात सर्वानी सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

 
Top