
कोरोना वायरसमुळे गेल्या दोन महिन्यापासून देशात रेल्वे सेवा बंद होती, येत्या १ जून पासून रेल्वे मंत्रालयाने सर्व विभागात २०० मेल एक्सप्रेस सुरू करण्यात परवानगी दिली आहे. परंतु मराठवाडा विभागात मात्र नांदेड विभागातून रेल्वे सुरू करण्यात परवानगी दिली आहे. तर लातूर-उस्मानाबाद या जिल्हयात मात्र एक ही रेल्वे सेवा सुरू करण्यास परवानगी न दिल्याबद्दल रेल्वे विभागाचा तीव्र शब्दात निषेध सचिव रेल्वे संघर्ष समिती उदगीर सल्लागार सदस्य द.म.रेल्वे सिकंदराबाद तथा अभ्यासक मोतीलाल डोईजोडे यांनी करून बिदर-लातूर-मुंबई मार्गे उस्मानाबाद या रेल्वेस पण मंजुरी द्यावी अशी मागणी करण्यात आली आहे.
रेल्वे अभ्यासक मोतीलाल डोईजोडे यांनी सांगितले की, रेल्वे मंत्रालय दिल्ली व रेल्वे बोर्ड यांच्या आदेशाने 1 जून 2020 पासून देशभरात 200 मेल एक्सप्रेस स्पेशल म्हणून चालविणार आहे. आपल्या भागातील रेल्वे द.म. रे््च्या अखत्यारीत येत असून ते ऐकून 9 रेल्वे सुरू करत आहेत त्यातील फक्त एक रेल्वे नांदेड ते अमृतसर धावणार असून नांदेड,परभणी,जालना व औरंगाबाद विभागातील मराठवाड्याच्या प्रवासायांची सोय होणार आहे तर प्रसिद्धीपत्रकात नमूद केले प्रमाणे एकही रेल्वे विकाराबाद-बिदर-उदगीर-परळी वैजनाथ किंवा विकाराबाद-बिदर-उदगीर-लातूररोड-लातूर-उस्मानाबाद-कुर्डुवाडी मार्गावर सोडली नाही त्याबद्दल दक्षिण मध्य रेल्वेचा त्यांनी निषेध केला आहे पुणे मुंबईत अनेक उद्योग सुरू झाले आहेत अनेक लोकाना पोटापाण्यासाठी काम करणे आवश्यक आहे त्या मुळे बिदर-लातुर -मुंंबई रेल्वे सेवा सुरु करावी अशी मागणी करण्यात आली आहे