उस्मानाबाद/प्रतिनिधी-
 कोरोना संसर्गजन्य व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकार प्रयत्न शील असुन त्याचाच एक भाग म्हणुन    उस्मानाबाद तालुक्यातील  बेंबळी या गावातील  महाराष्ट्र ग्रामीण बँकेत येणाऱ्या ग्राहकांची विशेष काळजी घेतली जात आहे.
बँक सेवा ही अत्यावश्यक  सेवा असून बँकेत  येणाऱ्या  ग्राहकाची संख्यामोठी आहे. विविध योजनासह बँक खात्याच्या  कामासाठी वृद्ध ,माणसे ,महिला, बँकेत  येणे जाणे असते परंतू कोरोन च्या पाशर्वभूमीवर संसर्ग रोखता यावा यासाठी बेंबळी येथील महाराष्ट्र ग्रामीण बँकेत   फिजिकल डिस्टन्सिंग पाळले जात असून प्रत्येक ग्राहकांच्या  हातावर सँनीहायझर टाकून हात स्वच्छे केल्या नंतर प्रवेश दिला जात आहे ,   बँकेचे व्यवस्थापक आर व्ही नागने यांच्या सह बँकेचे   कर्मचारी यादव ,चित्रुक,  आमोल वालके, यासह सर्व कर्मचारी ग्राहकांना वेळोवेळी मार्गदर्शन करीत आहेत. तरी ग्राहकांची कसल्याही प्रकारची हेळसांड होऊ देणार नसल्याचे बँक व्यवस्थापक आ.व्ही नागणे यांनी सांगितले आहे
 
Top