तुळजापूर/प्रतिनिधी -
महाराष्ट्राची कुलस्वामिनी श्रीतुळजाभवानी मातेच्या पुण्यपावन नगरीत असलेल्या जिल्हयातील एकमेव्य छञपती संभाजी राजेच्या सिंहाचा जबड्यात घालुन हात या अवस्थेतील भव्य पुतळ्यास आ राणाजगजितसिंहपाटील,  नगराध्यक्ष सचिन रोचकरी यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन धर्मवीर संभाजी जयंती सोशल डिस्टंन्सिंग चे पालन करुन साधेपणाने शंभुराजे जयंती साजरी करण्यात आली.
यावेळी छावा क्रांतीवीर संघटना जाणता राजा युवा मंच जय भवानी तरुण मंडळ संभाजीराजे तरुण मंडळ मराठा सेवा संघ संभाजी ब्रिग्रेड जिजाऊ बिग्रेड शिवभवानी प्रतिष्ठान शिवबाराजे प्रतिष्ठान जिजामाता प्रतिष्ठान शिक्षकसेना अदि संघटनेच्या प्रमुख पदाधिकारीने राणी लक्ष्मीबाई उद्यानातील शंभुराजे पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.यावेळी छावा क्रांतीवीर संघटनेचे प्रदेश प्रवक्ते जीवनराजे इंगळे, जिल्हाअध्यक्ष महेश गवळी, शहराध्यक्ष कुमार टोले, किशोर पवार, अण्णा क्षिरसागर , युवा नेते विनोद गंगणे, राजे संभाजी मंडळाचे संस्थापक अध्यक्ष विशाल छञे, राम छञे, सतिश खोपडे, सुदर्शन वाघमारे , अर्जून सांळुके, मयुर कदम  तुकाराम ढेरे, दादा भोसले, दिपक पवेकर आदी उपस्थितीत होते.
 
Top