उस्मानाबाद /प्रतिनिधी-
 जगात सर्वत्र कोरोना महामारीने उग्र रुप धारन केलेले असल्यामुळे पुणे-मुंबई येथे कामासाठी गेलेले अनेक जण आप आपल्या गावी परतत आहेत. परंतू अशा या लोकांची परतत असलेल्या ठिकाणाहून योग्य ती तपासणी झालेली असेलच असे सांगता येत नाही किंवा झालेली असली तरी त्यांना परत आपल्या गावी आल्या नंतर पुन्हा कोरोनाची लागण होत असल्याच्या अनेक केसेस समोर आल्याने अशा लोकांची उस्मानाबाद तालुक्यातील उपळा, वाघोली, काजळा येथे तपासणी करण्यात आली.
त्याशिवाय याच परिसरातील शिक्षकवर्ग, आरोग्य कर्मचारी, ग्रामपंचायत कर्मचारी यांच्यावरही तसेच मुंबई-पुण्याहून आलेल्या लोकांना आयसोलेशन करणे किंवा त्यांच्या इतर व्यवस्था करण्याचे काम असल्याने अशा लोकांच्या संपर्कात आलेले हे कर्मचारी त्यांच्या संपर्कात आलेले आहेत का? असतील तर त्यांची त्यांची थर्मल स्क्रिनींग करुन कोरोना संक्रमणाची तपासणी करुन घेण्यात आली. तसेच रक्तदाब, मधुमेह व इसीजीआदी तपासण्या करुन त्याना कुठला संसर्ग होऊ नये म्हणून त्यांना रोग प्रतिबंधात्मक औषधी देण्यात आली.
उस्मानाबाद तालुक्यातील उपळा, वाघोली, काजळा या भागातील जवळपास 60 कर्मचारी व इतर लोकांची तपासणी केली गेली. या कार्यात डॉ. मंगेश देशमुख, डॉ. महेश गुरव यांनी ‘असरनिक अल्बम’ औषध उपलब्ध करुन देण्यात आले. यावेळी शिक्षक विकास मगर सर वाघोली एल.बी. बापू पडवळ सर, अमोल पडवळ सर उपळा यांनी मोलाचे सहकार्य केले. त्याशिवाय या भागात करोना पसरू नये यासाठी कार्य तत्पर असणारे सरपंच रवि विजय पाटील, काजळा, सरपंच उत्तरेश्वर गोगाळे, वाघोली, सरपंच बप्पा पडवळ, उपळा यांनी व इतर सर्व ग्रामपंचायत कर्मचारी वर्गाच्या तपासण्या करुन घेण्यात आल्या.
 
Top