तुळजापूर/प्रतिनिधी-
महाराष्ट्राची कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी मातेच्या पुण्यपावन नगरीत घाटशिळ पायथ्याशी असलेले वसुंधरा संस्कृतीक भवन येथे  देशावरील कोरोना संकट दूर होण्यासाठी व माजी मुख्यमंञी तथा विद्यमान मंञी अशोक राव चव्हाण  यांच्या आरोग्यासाठी गुरुवार दि.28रोजी एक दिवसाचा शतचंडी महायज्ञ करण्यात आला.
घाटशिळ पायथाशी असणाऱ्या वसुंधरा  सांस्कृतिक भवन  येथे  श्री विठ्ठल रूक्मीणी संस्थानचे माजी सदस्य  वसंतराव पाटील व त्यांच्या सुविद्य पत्नी सौ. पाटील ताई यांनी हा शतचंडी यंज्ञ केला याचे पौराहित्य उपाध्य कुलकर्णी सिंदफळकर यांनी केले. या शतचंडी यज्ञ स्थळी राष्ट्रवादी काँग्रेसचे गोकुळ तात्या शिंदे, विजय भोसले, ढेकररीकर ,  शिवसेनेचे शहरप्रमुख सुधीर कदम सह अनेकांनी भेट देवुन मनोभावे दर्शन घेतले.
 
Top