लोहारा/प्रतिनिधी
 लोहारा तालुक्यातील दक्षिण जेवळी येथे जिल्हा रुग्णालय उस्मानाबाद, स्पर्श ग्रामीण रुग्णालय सस्तुर,  यांच्या सहकार्याने येथील सामाजिक कार्यकर्ते महादेव कारभारी यांच्या पुढाकारातून रक्तदान शिबिर घेण्यात आले. या रक्तदान शिबिरास जेवळी ग्रामस्थांनी उत्सूर्फ प्रतिसाद दिला. यावेळी 51 युवकांनी रक्तदान केले.
या कार्यक्रमास डॉ. रमाकांत जोशी, सरपंच चंद्रकांत साखरे, बी.एम.बिराजदार, कमालकर कोळी, बाबुराव भुसने, माजी सैनिक इरेशा होनाजे, पत्रकार बसवराज होनाजे, सुधीर येनेगुरे, अदि, उपस्थित होते. यावेळी डॉ. रमाकांत जोशी यांनी उपस्थित लोकांना रक्तदानाचे महत्व तसेच कोरोना विषयी घ्यायची काळजी या विषयी सविस्तर मार्गदर्शन केले. तसेच महादेव कारभारी यांनी रक्तदान शिबिर गावागावात व्हावे, असे आवाहन केले. रक्तदान शिबिर यशस्वी करण्यासाठी काशिनाथ लकडे, तानाजी शिवरे, महादेव भूसप्पा, राहुल होनाजे, प्रवीण भुसप्पा, निलेश भुसप्पा, संदेश होनाजे, नेहरू युवा केंद्राचे तालुका समन्वयक किशोर होनाजे, श्रीशैल्य भंडारकवठे, अदिनी, परिश्रम घेतले.
 
Top