नळदुर्ग /प्रतिनिधी-
नळदुर्ग येथे दि.२२ मे रोजी शहर भाजपाने राज्यांतील महाविकास आघाडी सरकारचा जाहीर निषेध केला तर शहर शिवसेनेने महाविकास आघाडी सरकारला पाठींबा देत भाजपाचा जाहीर निषेध केला. राज्यात मोठयप्रमानात कोरोनाचा फैलाव झाला आहे कोरोनाला रोखण्यात महाविकास आघाडी सरकार पुर्णपणे अपयशी ठरल्याचा आरोप भाजपाने केला असुन याप्रकरणी दि.२२ मे रोजी संपुर्ण राज्यात भाजपाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी ‘महाराष्ट्र बचाव’हे आंदोलन करून महाविकास आघाडी सरकारचा जाहीर निषेध करावा असे आवाहन प्रदेश भाजपाच्यावतीने करण्यात आले होते.
या आवाहनाला प्रतीसाद देत दि.२२ मे रोजी सकाळी ११ वाजता शहर भाजपाच्यावतीने शहर अध्यक्ष पद्माकर घोडके यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडी सरकारचा जाहीर निषेध करण्यात आला.यावेळी पद्माकर घोडके यांच्यासह दत्ता राजमाने, धीमाजी घुगे, शहर भाजयुमोचे अध्यक्ष श्रमिक पोतदार, शहर भाजपाचे सरचिटणीस सागर हजारी, मयुर महाबोले आदीजन उपस्थित होते. भाजपाच्या या आंदोलनाकडे शहरांतील भाजपाच्या ११ नगरसेवकांनी मात्र पाट फिरविल्याचे दिसुन आले., भाजपाचे आमदार राणा जगजितसिंह पाटील हे शहरात आले की त्यांच्या मागे पुढे घुटमळणारे नगरसेवक व कांही पदाधिकारी या आंदोलनात सहभागी का झाले नाहीत असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. वास्तविकपाहता प्रदेश भाजपाने हे आंदोलन करण्याचे आवाहन केले होते त्यामुळे हे आंदोलन दणक्यात करणे गरजेचे होते. मात्र नळदुर्ग शहरांत कांही मोजक्या पदाधिकाऱ्यानीच हे आंदोलन केले इतरांनी मात्र या आंदोलनाकडे पाट फिरविल्याचे दिसुन आले. त्याचबरोबर शहर शिवसेनेच्यावतीने राज्यांतील महाविकास आघाडी सरकारला पाठिंबा देत भाजपाचा जाहीर निषेध केला. हे आंदोलन शिवसेनेचे माजी उपजिल्हा प्रमुख कमलाकर चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले. या आंदोलनात शहरप्रमुख संतोष पुदाले,उपतालुका प्रमुख सरदारसिंग ठाकुर,काँग्रेसचे नगरसेवक विनायक अहंकारी, शिवसेनेच्या मिडिया सेलचे शहर प्रमुख सुनिल गव्हाणे, शाम कनकधर, नेताजी महाबोले,बंडप्पा कसेकर व भीमा कोळी आदीजन उपस्थित होते. यावेळी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यानी भाजपाच्या निषेधाच्या घोषणा दिल्या.
 
Top