उमरगा /प्रतिनिधी -
जगाला समतेचा आणि शांततेचा संदेश देणारे तथागत गौतम बुध्द यांच्या जयंतीनिमित्त गुरुवारी (दि.७)सकाळी साडेनऊ वाजता पंचशील नगर येथे कोरोना पार्श्वभूमीवर शारीरिक अंतर ठेवून बुध्दवंदना व प्रतिमा पूजन करण्यात आले.
प्रारंभी गौतम बुध्द, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचे पूजन जिल्हा मध्यवर्ती बँकेचे उपाध्यक्ष व भाजपचे तालुकाध्यक्ष कैलास शिंदे यांनी केले. प्रा. डॉ. ए. सी. गायकवाड यांनी पंचशील, बुध्दवंदना घेतली. यावेळी सुधीर कांबळे बोलताना म्हणाले, तथागत गौतम बुद्धांना प्रेरित असलेल्या धम्माची संकल्पना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी १९५६ साली धम्म दीक्षा घेवून तथागतांचा समतेचा अन् शांतीचा संदेश बहुजन समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी उपयुक्त ठरला. आज तथागत व डॉ. बाबासाहेबांचे विचार यापुढील काळातही जागृत ठेवायचे असल्यास बुध्द विचाराची गरज आहे. कोरोना पार्श्वभूमीवर पंचशील नगर येथील डॉ. एम. टी. सूर्यवंशी, बलराज हिप्परगे, प्रा. एन. एल. गायकवाड, प्रा. आर. पी. जकाते, बालाजी गायकवाड, विजयकुमार कांबळे, कडाजी बर्मा, टिळे मंदाकिनी, सरस्वती गायकवाड, शांताबाई गायकवाड नामदेव सुरवसे, पंढरी गायकवाड, लक्ष्मण नाकेदार, सतीश गायकवाड आदींनी घरातच थांबून तथागत गौतम बुध्द व डॉ. बाबासाहेब यांना अभिवादन केले. बालाजी गायकवाड यांनी घरातच राहून तथागतांचा विचार सोशल मीडियावरून सर्वांपर्यंत पोहोचवावे असे सांगून आभार मानले.
 
Top