तुळजापूर/प्रतिनिधी -
शहरातील प्रभाग क्रमांक पाच  मधील सिद्धार्थ नगर येथील गोरगरिबांना बुद्ध पौर्णिमेनिमित्त 101  किराणा किटचे वाटप करण्यात आले.
सध्या देशात कोरोनाच्या संकट समयी सामाजिक बांधीलकी म्हणून तुळजापूर शहरातील प्रभाग क्रमांक 5 मधील सिध्दार्थ नगर येथे बुध्द पौर्णिमेनिमित्त  गोरगरिबांना 101 किराणा  किटचे माजी नगराध्यक्षा सौ अर्चनाताई विनोद गंगणे व नगरसेविका सौ हेमाताई औदुंबर कदम,सौ दिपाली रामचंद्र ढवळे,नगरसेवक विशाल भैया रोचकरी यांच्या हस्ते वाटप करण्यात आले,प्रथम बुध्द वंदना करण्यात आली, त्यानंतर सोशल डिस्टन्सचे नियम पाळून किटचे वाटप करण्यात आले, यावेळी तुळजापूर नगरीचे नगराध्यक्ष सचिन रोचकरी, विशाल रोचकरी, औदुंबर कदम, अॅड,रामचंद्र ढवळे,दिपक कदम,अभिषेक कदम,विशाल कदम,अरविंद कदम,श्री नारायणराजे गवळी,बल्ली कदम,श्रीकांत चौधरी, बाबा कदम, बाळु डावरे, धनंजय जानराव,जयदेव कदम,चंद्रशेखर कदम, सह औदुंबर दादा मिञ परिवार यात सहभागी झाले होते,
 
Top