उस्मानाबाद/प्रतिनिधी-
उस्मानाबाद कोरोनाग्रस्त झालेल्या देशातील मार्केटचा अभ्यास करून व शासनाने दिलेल्या अधिकारानुसार कंट्रोलींग करण्यासाठी जिल्हयातील मार्केट सोमवार, बुधवार, शुक्रवार या प्रमाणे एक दिवसाआड चालू राहतील अशी माहिती जिल्हाधिकारी दिपा मुधोळ-मुंडे यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली.
या पत्रकार परिषदेस जिल्हा परिषदचे सीईओ डॉ. संजय कोलते, पोलिस अधिक्षक राजतिलक रोशन उपस्थित होते. अधिक माहिती देताना, जिल्हाधिकारी दिपा मुधोळ-मुंडे म्हणाल्या की, कोरोनाग्रस्त देशातील मार्केटचा अभ्यास करूनच त्यांच प्रमाणे सोशल डिस्टन्सचे पालन करूनच मार्केट सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. जिल्हयातील हॉटेल, रेस्टॉरेन्ट यांना किचन चालु करण्याची परवानगी दिली असून, पार्सल सेवा देण्याचा सूचना करण्यात आली आहे. जिल्हयातील सर्व सलुन दुकान, पानटपऱ्या, शैक्षणिक संस्था व सेवा या बंद राहतील. त्याच प्रमाणे बांधकाम करण्यास परवानगी दिली असली तरी, स्थानिक मजुर असतील तरच ही परवानगी असेल, जनतेने लग्न समारंभ व अन्य कार्यक्रम घरगुती स्वरूपात उरकावे, कापड दुकानदारांना आपली दुकाने उघडण्यास परवानगी दिली असून
टेबलावर फक्त कपडे दाखविणे आवश्यक असल्याच्या सूचना त्यांनी दिल्या.
सकाळी १० ते दु. १ पर्यंत मार्केट चालू 
जिल्हयात अत्यावश्यक सेवा नियमित चालू असल्यातरी जिल्हयातील मार्केट मात्र सोमवार, बुधवार, शुक्रवार या तीनच दिवशी सकाळी १० ते १ पर्यंत चालू राहणार आहे. यामुळे कोरोना वायरसचा प्रसार ही होणार नाही, असे जिल्हाधिकारी मुधोळ-मुंडे यांनी सांगितले.
जिल्हयात ७ टँकर तर ७२३ कामे सुरू
उस्मानाबाद जिल्हयात उस्मानाबाद व परंडा तालुक्यात एकुण ७ पाण्याचे टॅँकर चालू आहेत, तर ३३ गांवात ४० विंधन विहीरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतंर्गत ४४५ ग्रामपंचायतींमध्ये ७२३ कामे सुरू करण्यात आली आहेत. याच्यावर ६ हजार ७१७ मजूर कामे करीत आहेत. याशिवाय २१० विहीरी, ४ शेततळे, १२० घरकुल, ३६१ सार्वजनिक पाणीपुरवठा विहीरीचे काम तर १६ रस्त्याचे कामे जिल्हयात चालू आहेत. याशिवाय गाळ काढण्याच्या ८३ कामांना मंजुरी देण्यात आली आहे. तर ४७५ ग्रामपंचायतीमध्ये ३३५ रस्त्यांच्या कामांना सहमती दिली आहे, अशी मािहती जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय कोलते यांनी दिली.
३० बॉर्डर चेक नाक्याद्वारे जिल्हा सिल 
उस्मानाबाद जिल्हा ग्रीन झोन झाल्यामुळे जिल्हा ३० बॉर्डर चेक नाक्याने सिल केला आहे. त्याच प्रमाणे प्रत्येक गांवात ग्रामसुरक्षा दल स्थापन करण्यात आले आहे. जिल्हयात आतापर्यंत मास्क न वापरने, सोशल डिस्टसिंग न पाळणे, दरपत्रक न लावणे आदी संदर्भात ५०० केसेस केल्या असून त्यांच्याकडून एकुण २ लाख रुपयांचा दंड वसूल केला. तर दुसऱ्या एका प्रकरणात २२ मार्च पासून ते आतापर्यंत ४६५ प्रकरणात ३५ लाख रुपयांचा दंड वसूल केला अाहे. विनाकारण फिरणाऱ्या २ हजार ५४५ वाहने जप्त करून एकुण १० लाखाचा दंड वसुल करण्यात आला आहे. जिल्हयात पेट्रोलींग नियमीत चालू असून हेल्पलाईन व कंट्रोलवर मदतीसाठी २ हजार कॉल आल्याची माहिती मिळाली. जिल्हा ग्रीन झोन मध्ये आलातरी स्वंयशिस्त पाळण्े आवश्यक असल्याचे पोलिस अधिक्षक राजतिलक रोशन यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

 
Top