उस्मानाबाद/ प्रतिनिधी-
उस्मानाबाद जिल्ह्यातील दारू विक्रीची दुकाने ही आठवड्यातील केवळ ३ दिवसासाठी सुरु करण्यात येणार होती.आठवड्यात सोमवार, बुधवार व शुक्रवार या ३ दिवसासाठी सकाळी १० ते १ या ३ तासाच्या वेळेत ही दुकाने सुरू करण्याचे आदेश जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मुंडे यांनी दिले होते. त्यानंतर मद्यप्रेमी नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले होते, परंतु जिल्हाधिकारी दिपा मुधोळ-मुंडे यांनी तो आदेश रद्द केला. त्यामुळे मद्यप्रेमी नागरिकांमध्ये नाराजगी पसली असल्याची माहिती मिळत आहे.
उस्मानाबाद जिल्ह्यातील मद्यप्रेमीच्या स्वप्नांवर पाणी फिरले असून 6 मे म्हणजे उद्यापासून सुरू होणारी दारू विक्री बंदीचे आदेश जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मुंडे यांनी दिले आहेत. उस्मानाबाद ग्रीन झोनमध्ये समाविष्ट असल्याने दारू विक्री सूरु होईल असे वाटत असतानाच उस्मानाबाद जिल्हयात दारू विक्रीची 4 मे रोजी काढलेला आदेश कागदावरच राहिला.

 
Top