परंडा /प्रतिनिधी-
इस्लाम धर्मातील पवित्र रमजान माहिन्याच्या शेवटच्या बडी रात नंतरचा मोठा रोजा शहरातील अमायरा वसीम शेख (६ वर्ष ) हिने दि.२२ शुक्रवार रोजी या लहान मुलीने पहिला रोजा केला.
 सध्या उष्णतेने उग्ररूप धारण केले आसताना ही अशावेळी मोठमोठ्याना रोजा कठीण जात आहे. यातच ६ वर्षीय अमायरा या चिमुकलीने आपला बडी रात नंतरचा मोठा रोजा पूर्ण पार पाडला.रोजा इफ्तार नंतर तीने कोरोना रोगाचे संकट दुर करण्यासाठी अल्लाह कडे प्रार्थना केली.अगदी लहानशा वयात मोठा रोजा ठेवल्याने अमायराचे कौतुक होत आहे.

 
Top