परंडा प्रतिनिधी : -भाजपा प्रदेश सरचिटणीस आमदार सुजितसिंह ठाकूर यांनी दि.२२ शुक्रवार रोजी तहसीलदार अनिलकुमार हेळकर, गटविकास अधिकारी रावसाहेब चकोर, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी दीपक इंगोले यांच्या समवेत परंडा शहर व तालुक्यातील कोरोना प्रादुर्भाव परिस्थितीचा विस्तृत आढावा घेऊन करावयाचे नियोजन व उपाययोजनांबाबत सूचना केल्या.
परंडा येथील उपजिल्हा रूग्णालयात परंडा तालुक्यातील खंडेश्वरवाडी येथील ३आणि शुक्रवारी रात्री उशीरा आलेल्या स्वॅब तपासणी अहवालानुसार कुक्कडगाव येथील १ तसेच भूम तालुक्यातील पन्हाळवाडी येथील १, गिरवली येथील १ असे ६ कोरोना बाधित रूग्णांवर उपचार सुरू आहेत.परंडा तालुक्यात सरणवाडी येथील बरा झालेल्या एका रूग्णांसह ५ कोरोना बाधित आहेत. बाहेरून गावाकडे येणा-या लोकांची संख्या वाढते आहे.
खबरदारीचा उपाय म्हणून कोरोना संक्रमित व्यक्तीच्या प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष संपर्कात आलेले तसेच बाहेरून अन्य शहरांतून येणारे यांची परंडा येथे डाॅ.बाबासाहेब आंबेडकर वस्तीगृह, रा.गे.शिंदे महाविदयालय,संत मीरा इंग्लिश स्कूल, प्रितम मंगल कार्यालय येथे वर्गवारी करून संस्थात्मक विलगीकरण (इन्स्टीट्यूशनल कोरोंनटाईन) करण्यात येणार आहे.यासाठी आमदार सुजितसिंह ठाकूर हे स्वत: १०० बेडची व्यवस्था करून देत आहेत.ग्रामीण भागातही प्रत्येक गावात संस्थात्मक विलगीकरणाची व्यवस्था केली गेली आहे.
परंडा शहर व तालुक्यात बाहेरगावाहून आलेल्या व्यक्तींनी आपणां सर्वांच्या सुरक्षिततेसाठी स्वत:हून प्रशासनास माहिती देऊन नोंद करावी तसेच असे कोणी आल्याचे निदर्शनास आल्यास प्रशासनास कळवावे, असे आवाहन आमदार सुजितसिंह ठाकूर यांनी केले आहे
 
Top