तुळजापूर / प्रतिनिधी
 लॉकडाऊनमुळे अनेक नागरिक अनेक ठिकाणी अडकून पडले आहेत तसेच भिक्षा मागून जगणारे अनेक ठिकाणी अडकून पडले आहेत. अणदूर गावात आलेल्या आणि  भिक्षा मागत भटकणाऱ्या एका व्यक्तीला अणदूरमधील पंडित कोळी आणि शिवानंद खुने यांनी आसरा देऊन  माणुसकीचे दर्शन घडविले.
मानसिक संतुलन बिघडलेला एक व्यक्ती अणदूरमध्ये भटकत होता. त्याच्या डोक्यावर केस वाढलेले, दाढी वाढलेली, कपडे फाटलेले, त्यामुळे त्याला जवळ कुणी करत नव्हते. अश्या या व्यक्तीस पंडित कोळी आणि शिवानंद खुने  यांनी बाबुराव भुरे या  न्हाव्यास बोलावून त्याची  कटिंग, दाढी करून घेतली, नंतर त्यास स्वच्छ आंघोळ  घालून दुसरे कपडे दिले आणि नंतर पोटभर जेऊ घातले.
अणदूरच्या जवाहर विद्यालयात शिपाई म्हणून काम करणारे पंडित कोळी यांचा काल वाढदिवस होता. त्यांनी आपला वाढदिवस एका बेवारस असलेल्या एका भिक्षुकाची सेवा करून साजरा केला. 

 
Top