तुळजापुर/प्रतिनिधी -
तुळजापूर तालुका व शहरात अहोरात्र आपल्या जिवाची बाजी लावत नागरीक आणि देशाची सेवा करत असलेले पोलीस अधिकारी, ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टर आणि सिस्टर , तहसीलदार व कर्मचारी, विज महावितरण कर्मचारी, नगर परिषदचे मुख्याधिकारी, नगराध्यक्ष, स्वच्छता कर्मचारी, शहरातील सिमेवरील चेक पोस्ट वर सेवा देणारे कर्मचाऱ्यांवर पुष्पवृष्टी  करुन त्यांच्या सेवेचा सन्मान    शहराचे प्रथम नागरिक नगराध्यक्ष सह नगरसेवक सामाजिक कार्यकते यांनी केला.
यावेळी नगराध्यक्ष सचिन रोचकरी यांनी दिलेल्या योगदानाबद्दल त्याच्यावर ही पुष्पवर्षाव करून सन्मान करण्यात आला. यावेळी  आनंद दादा कंदले, नगरसेवक औदुंबर  कदम,  अभिजित कदम, रत्नदिप भोसले,  राम जाधव सह अनेक नगरसेवक सामाजिक कार्यकते मोठ्या संख्यने उपस्थित होते.
 
Top