उस्मानाबाद / प्रतिनिधी-
उस्मानाबाद जिल्हयात कोरोनाचा आणखी एक रुग्ण सापडला असून कळंब तालुक्यातील शिराढोण येथील एक महिला पॉझिटिव्ह आली आहे, ही महिला पुणे येथून आली असून ती लातूर येथे उपचारसाठी गेल्यावर कोरोना टेस्ट २० मे २०२० रोजी   करण्यात आली त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला असून लातूर येथे उपचार सुरू असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ हनुमंत वडगावे यांनी दिली, या रुग्णाचा अहवाल आल्यानंतर शिराढोण येथे प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवायला युद्ध पातळीवर सुरुवात केली आहे.
 
Top