उस्मानाबाद /प्रतिनिधी-
संपुर्ण जगभरासह भारतामध्ये कोविड - १९ या विषाणुजन्य महामारीने थैमान घातले आहे. अशा या गंभीर संकटसमयी केंद्र व राज्य शासन प्रयत्नाची पराकाष्टा करून, सर्व देशाला या महामारीपासून वाचवण्याचा आटोकाट प्रयत्न करत आहे.
अशा संकटसमयी   रूपामात अॅग्रोटेक प्रा.लि.पाडोळी (आ), उस्मानाबाद जिल्हयामध्ये कोविड़ - १९ आजाराविषयी तपासणीबाबत स्थापित प्रयोगशाळा व संशोधन कार्यासाठी रक्कम रू.५१,०००/- (अक्षरी.एकावन्न हजार रुपये फक्त)  हजाराचा
धनादेश  जिल्हाधिकारी दिपा मुधोळ मुंडे यांना रुपामाताचे अध्यक्ष  ॲड, व्यंकटराव गुंड यानी  सुपूर्द केला. तसेच याच कामासाठी रूपामाता अर्बन पतसंस्थ्ेच्या वतीने २५ हजार रुपयाचा धनादेश देण्यात आला. (भारतीय स्टेट बँक च्या धनादेश क्रं.६८६२६८ दि.१९/०५/२०२० रक्कम रू.५१,०००/-) (अक्षरी.एकावन्न हजार रूपये फक्त) या वेळी अप्पर जिल्हाधिकारी शिरीष यादव, डी.डी.आर. विश्वास देशमुख, रुपामाताचे एम. के. सुर्यवंशी,  ॲड शरद गुंड,  ॲड.अजित गुंडा आदी उपस्थित होते
 
Top