उस्मानाबाद / प्रतिनिधी-
 जिल्हा सामान्य रुग्णालय उस्मानाबाद येथून आजतागायत एकुण 941 व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. यामध्ये उस्मानाबाद तालुक्यातील 190 , तुळजापूर 186, उमरगा 218, लोहारा 68, कळंब 166, वाशी 11, भूम 36, परंडा 66 व्यक्तींचा समावेश  आहे. त्यापैकी 807 व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आले असून 31 व्यक्तीचा अहवाल (Rejected) आला आहे. तसेच 88 व्यक्तींचे अहवाल हे अप्राप्त आहेत. आज दि.20 मे 2020 पर्यंत एकुण 16 कोविड पॉझिटिव्ह रुग्ण उस्मानाबाद जिल्हयात आढळुन आले. त्यापैकी 4 रुग्णांची प्रकृती चांगली असल्यामुळे उमरगा तालुक्यातील 3 व परंडा तालुक्यातील 1 रुग्णांना  रुग्णालयातुन रोगमुक्त (डिस्चार्ज) करण्यात आले.  सद्यस्थितीमध्ये एकुण कोविड पॉजिटिव्ह रुग्ण 12 असुन ते पुढीलप्रमाणे रुग्णालयात उपचार घेत आहेत. कंळंब येथील एका रुग्णाची प्रकृती गंभीर असल्यामुळे त्यांना वैद्यकिय महाविद्यालयात सोलापुर येथे पुढील उपचारासाठी संदर्भित करण्यात आले आहे . तसेच उपजिल्हा रुग्णालय तुळजापुर येथे 2, उपजिल्हा रुग्णालय परंडा 4, उपजिल्हा रुग्णालय कळंब 4 व जिल्हा रुग्णालय उस्मानाबाद येथे 1 असे एकुण 12 कोविड पॉजिटिव्ह रुग्ण उपचार घेत आहेत.  सध्या त्यांची प्रकृती चांगली असुन मृत्यु निरंक आहे,  अशी माहिती  उस्मानाबादचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आर.व्ही. गलांडे यांनी दिली आहे.
 
Top