उमरगा/प्रतिनिधी-
कसगी ता.उमरगा येथे आ.ज्ञानराज चौगुले यांच्या अध्यक्षतेखाली कोरोना ग्रामसुरक्षा दलाची बैठक सम्पन्न झाली. कोरोना आजाराच्या पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षकांच्या सूचनेनुसार गावागावांत ग्रामसुरक्षा समितीची स्थापना करण्यात आली आहे.
 गावात बाहेर जिल्ह्यातून येणाऱ्या लोकांच्या नोंदी घेणे, त्यांना घरगुती किंवा संस्थात्मक विलगीकरणात ठेवण्यास मदत करणे, गावातील इतर लोक त्यांच्या संपर्कात येणार नाहीत ना याची दक्षता घेणे, गावातील वाहतूक सुरळीत करणे, बाजारपेठेमध्ये सामाजिक अंतर राखण्यात येत आहे की नाही याची दक्षता घेणे, आदी जबाबदाऱ्या या सुरक्षा दलांना दिल्या आहेत. या दलाची बैठक आ.ज्ञानराज चौगुले यांच्या अध्यक्षतेखाली कसगी येथे पार पडली. यावेळी दलातील सदस्यांना ओळखपत्रांचे वाटपही करण्यात आले. गावात येणारे लोक ही आपलीच भाऊ-बंदकी असून त्यांच्याशी सौदार्हयाने व आपुलकीनेच वागले पाहिजे व पुढील 14 दिवसाच्या कार्यकाळात फक्त त्यांनी समितीने व शासनाने ठरवून दिलेल्या नियमांचे पालन करणे गरजेचे असल्याचे मत आ.ज्ञानराज चौगुले यांनी यावेळी मांडले. बैठकीस सरपंच बबिता कांबळे, माजी सरपंच हणमंत गुरव, पोलीस निरिक्षक संतोष शेजाळ, पोलीस उपनिरीक्षक सिद्धेश्वर गोरे व विजयकुमार वाघ, गावचे पोलीस पाटील आदी उपस्थित होते.
 
Top