उस्मानाबाद / प्रतिनिधी-
करोनामुळे पसरलेल्या अवास्तव धास्तीमुळे निगेटिव्ह असलेल्या जन्मदात्या पित्याचा मृतदेह ताब्यात घेण्यास पोटच्या मुलानेच नकार दिला. विशेष म्हणजे सदर व्यक्तीस मृत व्यक्ती फुफूसाचा रोग असल्यामुळे जिल्हा शासकीय रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. सध्या कोरोना महामारीची साथ चालू असल्याने सदर मृत व्यक्तीचा स्वॉब तपासणीसाठी पाठविण्यात आला होता. तो निगेटीव्ह आला होता.
परंतु कोरोना भितीमुळे मुलाने   बापाचा  मृतदेह नाकारल्याने  दोन दिवस सदर मृतदेह उस्मानाबाद जिल्हा शासकीय रुग्णालयात पडून होता. जन्मदात्या पित्यावर अंत्यसंस्कार करण्यास असमर्थ असल्याचे मुलाने लिहून दिल्यामुळे बेवारस अशी नोंद घेत उस्मानाबाद नगरपालिकेवर अंत्यसंस्कार करण्याची वेळ आली. त्यामुळे सोमवारी मयत झालेल्या परंडा तालुक्यातील उकडगाव येथील मयतावर बुधवारी कपिलधार स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.
 
Top