उमरगा/प्रतिनिधी-
 रखरखत्या उन्हात जगण्याची धडपड करणाऱ्या कर्नाटकातील विजापूरसह अन्य भागातून उमरगा तालुक्यात दाखल झालेल्या हजारो मेंढपाळांची लॉक डाऊनमुळे सद्या उपासमार सुरू आहे. मेंढपाळाना जगण्याचा आधार मिळण्यासाठी तालुका धनगर आरक्षण संघर्ष समितीने पुढाकार घेतला आहे.
कोरोना पार्श्वभूमीवर सर्वत्र लॉक डाऊन असल्याने कर्नाटकातील अनेक भागातील मेंढपाळ प्रतिवर्षी तालुक्यातील शेत शिवारात येत असतात यंदा लॉक डाऊन झाल्याने विजापूरसह अन्य भागातून आलेले हजारो मेंढपाळ आपल्या कुटुंबासह तालुक्यात अडकून पडले आहेत. दाखल झालेल्या मेंढपाळांची उपासमार होऊ नये यासाठी धनगर आरक्षण संघर्ष समितीच्यावतीने मेंढपाळ कुटुंबाला संसोरोपयोगी वस्तूंचे वाटप करण्यात आले. गेल्या दोन महिन्या पासून कोरोना संसर्गजन्य आजाराने धुमाकुळ घातल्याने संपुर्ण जनजीवन विस्कळीत झाले आहे. संपुर्ण आयुष्य चतकोर भाकरी करीता भटकंती करणाऱ्या कर्नाटक राज्यातील मेंढपाळ प्रतिवर्षा प्रमाणे यंदाहि मोठ्या प्रमाणात शेत शिवारात आले आहेत. लॉक डाऊनमुळे शिवारात निर्माण झालेली चारा पाण्याची टंचाई शिवाय शेतकरी शेतात मेंढरं बसविण्यासाठी धजावत नसल्याचे दिसून येत आहे. रखरखत्या उन्हात हजोरो मेंढरांना घेऊन आज या शिवारात तर उद्या त्या शिवारात नित्याचीच भटकंती सुरू आहे. मेंढपाळांची उपासमार होऊ नये, त्यांना जगण्याचा थोडाफार आधार मिळावा यासाठी  धनगर आरक्षण संघर्ष समितीच्या विजया सोनकाटे यांच्या पुढाकारातून दाबका शिवारातील मेंढपाळाना संसारोपयोगी वस्तूंचे वाटप करण्यात आले. यावेळी प्रा डॉ आप्पाराव सोनकाटे, सेवानिवृत्त गटशिक्षण धिकारी देविदास बनसोडे, माजी सैनिक खंडू दुधभाते, देविदास सुर्यवंशी, तात्याराव फडताळे, राघवेंद्र गावडे आदी उपस्थित होते. धनगर आरक्षण संघर्ष समितीच्या महिला आघाडी प्रमुख विजयाताई सोनकाटे  कोरोनाच्या संकटात शेतकरी शेतात मेंढरं बसविण्या करीता धजावत नसल्याने मेंढरा बरोबरच मेंढपाळांची उपासमार होत आहे.कोरोना संसर्गामुळे सद्या सर्वत्र गावबंदी करण्यात आली आहे.किराणा , भुसार , औषधी , साहित्य मेंढपाळांना उपलब्ध होत नसल्यामुळे उपासमार सहन करावी लागत आहे. सुपीक शेती व्यावसायाचा आधार मानण्यात येणाऱ्या मेंढपाळांना आता सामाजिक बांधिलकीचा आधार मिळण्याची गरज निर्माण झाली आहे. दररोज शिवारभर भटकंती करणाऱ्या मेंढपाळ महिलांच्या संरक्षणाची गरज आहे.कोरोनाच्या या संकटात मेंढपाळाना समाज बांधवांनी आधार द्यावा असे अवाहन त्यानी केले. प्रा.डॉ. आप्पाराव सोनकाटे यानी यावेळी पशुसंवर्धन विभागाच्या वतीने पावसाळ्याच्या तोंडावर मेंढरांना लसीकरण करण्याची गरज असल्याचे स्पष्ट केले.डॉ. किशोर घोडके , शिवराज गळाकाटे, सोनकाटे कुटूंबिय यांच्या वतीने मेंढपाळाना अन्न , धान्य व संसारोपयोगी साहित्याचे वाटप करण्यात आले.
 
Top