तुळजापूर/ प्रतिनिधी-
श्रीतुळजाभवानी मंदीर शहाजी महाध्दार ते  दशवतार मठ कडे जाणाऱ्या  उतार रस्त्यावर लावलेले बँरेकेटींग काढुन या भागातील नागरिकांची होणारी गैरसोय दूर करण्याची मागणी या भागातील रहिवाशांनी मुख्याधिकारी मार्फत जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन केली आहे
निवेदनात म्हटलं आहेकी श्रीतुळजाभवानी मंदीर महाध्दार ते शुक्रवार पेठ पाण्याची टाकी या मार्गावर असणाऱ्या उतार रस्त्यावर बँरेकेटींग लावुन शुक्रवार पेठ मध्ये जाण्याचा रस्ता बंद केल्याने  या भागातील रहिवाशांना जीवनाश्यक वस्तु व वैद्यकीय सेवा घेण्यास अडथळा निर्माण होत आहे.तरी हे बँरेकेटींग काढुन टाकण्याचा मागणी चे निवेदन रुपेश परमेश्वर, गणेश रोचकरी,  रोहीत कदम, सुंशात कदम,  प्रतिक कदम,  महेश कदम,  नागेश कदम,  शैलेश लोमटे, समाधान पवार, अक्षय क्षिरसागर संभाजी क्षिरसागर, आकाश क्षिरसागर, प्रशांत पलंगे, राजैश खुंटापळे अदिंनी केले आहे.
 
Top