तेर(प्रतिनीधी)
संत गोरोबांची मुर्ती उजळली ! लेवूनी चंदनाचा लेप !! धन्य धन्य झालो आम्ही !!! पाहूनी आज देवत्वाचे रूप !!!!
अशीच कांहीशी भावना उस्मानाबाद तालुक्यातील तेर येथील श्री.संत गोरोबा काकांचे मनोमन हाँटसाँप ग्रुपवर ऑनलाईन दर्शन घेऊन धन्य झालेल्या भाविक भक्तांच्या मनामनात आज उमटली होती .
निमीत्त होत वैशाख एकादशीच्या दिवशी चंदनाच्या लेपाने सजविलेल्या श्री.संत गोरोबा काका यांच्या मुर्ती दर्शनाचे .संतश्रेष्ठ श्री.गोरोबा काका यांचे तेर येथे तेरणा नदीच्या किणारी मंदीर असून पूर्वापार वसंत ञूतूमध्ये उन्हाळ्यामध्ये थंडावा वाटावा म्हणून वैशाख एकादशीच्या मध्यराञीपासून चंदनाच्या उटीपासून हातात विणा व पताका घेतलेली श्री. संत गोरोबा काकांची मुर्ती तयार करायला लागणारे चंदन अक्षय ञतियापासून वैशाख वद्य एकादशीपर्यंत उगाळले जाते.तीन ते चार किलो चंदन उगाळले जाते.एकादशीच्या राञीचे किर्तन संपल्यावर परंपरागत पतंगे कूटूंबाचा अभिषेक झाल्यानंतर एकादशीच्या मध्यराञीनंतर चंदनाची मुर्ती हातात विणा घेतलेली तयार करण्यात आली.ही मुर्ती ह.भ.प.रघुनंदन महाराज पूजारी,गुरूसिद्धप्पा कानडे,गोविंद महाराज पांगरकर,
विजय महाराज डक,हनुमंत कानडे,ध्व्रुव पुजारी यानी तयार केली.ह.भ.प.रघुनंदन महाराज पुजारी यांच्या हस्ते आरती करण्यात आली.मुर्ती दर्शनासाठी उघडली गेली.परंतू लाँडाऊनमुळे भाविकभक्तानी चंदनाची मुर्ती हाँटहाँसच्या ग्रूपवर पाहील्यावर संत गोरोबांची मुर्ती उजळली ! लेवूनी चंदनाचा लेप !! धन्य धन्य झालो आम्ही !!! पाहूनी आज देवत्वाचे रूप !!!!अशीच भावना भाविकभक्तांच्या मनामनात उमटली.चंदनाच्या उटीपासून तयार केलेली श्री.संत गोरोबा कांकाची मुर्ती तयार केल्यामुळे वैशाख एकादशीला उटीवारी एकादशी असे संबोधले जाते.
 
Top