उस्मानाबाद /प्रतिनिधी:-
कौशल्य विकास व उद्योजकता विभाग यांचे मार्फत होणारी 110 वी अखील भारतीय व्यवसाय (AITT), शिकाउ उमेदवारी योजना (ATS) परीक्षा ही माहे डिसेंबर 2019 ते फेब्रुवारी 2020 या कालखंडात होणार होती.मात्र कोरोना संसर्गामुळे सदरील परिक्षा पुढे ढकलण्यात आली आहे.तसेच 108 वी व 109 व्या परिक्षेचा प्रलंबित निकाल हा जवळपास सर्वच प्रशिक्षणार्थ्यांचा लागला आहे.तसेच प्रशिक्षणार्थ्यांच्या
कराराबाबत दि.31 ऑक्टोंबर 2019 ऐवजी ही मुदत दि.15 एप्रिल 2020 पर्यंत वाढविण्यात आलेली आहे.आता दि.15 एप्रिल 2020 पूर्वी ज्या शिकाउ उमेदवारांचे करार संपत आहेत, अशा सर्व रेग्युलर, रिपीटर सर्व शिकाउ उमेदवारांनीwww.apprenticeship.gov.in या संकेतस्थळावर तात्काळ ऑनलाईन अर्ज भरावेत.फिस मुलभूत प्रशिक्षण तथा अनुषंगिक सुचना केंद्रामध्ये (BTRI Center)मध्ये लॉकडाउन संपल्यानंतर जमा करावी.ऑनलाईन फॉर्म भरलेल्या प्रशिक्षणार्थ्यांची प्रात्यक्षिक परिक्षा घेवून सेशनल व प्रॅक्टीकलचे गुण भरणे तसेच इतर कार्यवाही संबंधित आस्थापनांची त्यांच्या लॉगइन मधून त्वरीत करावी व तसा अहवाल प्रस्तुत कार्यालयास इ-मेल द्वारे कळवावा, असे उस्मानाबाद औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे अंशकालीन प्राचार्य आर.बी.सावळेयांनी कळविले आहे..

 
Top