उस्मानाबाद / प्रतिनिधी-
उस्मानाबाद जिल्हयातील सर्व सलून दुकाने मागील दोन महिन्यापासून बंद  असल्याने दुकानदार व कारागीर यांच्यावर घरभाडे, दुकानभाडे व इतर खर्चा मुळे उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे सर्व दुकानदार हतबल झाले आहेत. जिल्हयातील इतर दुकाना प्रमाणे सकाळी ०८ ते दुपारी ०२ या वेळेत सलुन दुकाने चालू ठेवण्यास परवानगी देण्यात यावी, अशी मागणी उस्मानाबाद महाराष्ट्र नाभिक महामंडळाच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की,  यापूर्वी देखील दुकाने उघडण्याची परवानगी मिळणे बाबत  पत्र व्यवहार केलेला आहे. तरी देखील सुलून व्यवसायाला आपण परवानगी दिलेली नाही.सर्व सलून दुकानदार हे सरकारने जारी केलेल्या गाईड लाईन नुसार कोरोबा विषाणु रोगा  विषयी दक्षता घेवून काम करण्यास तयार आहेत. सलुन दुकानदार यांना आपल्या नियम व अटी घालून परवानगी देण्यात यावी. दुकानदार हे मास्क, हॅण्डग्लोज, हॅण्डवॉश, सॅनिटायझर इत्यादीचा वापर करून एका दुकानात एका वेळी एक ग्राहक व मोठया दुकानात एका वेळी दोन ग्राहक अशी व्यवस्था करण्यात येईल, येणा-या प्रत्येक ग्राहकाची नोंद व मोबाईल क्रमांक, दिनांक ग्राहकाने केलेले दाढी,कटींग, हेअर डाय इत्यादीचा नोंद संबंधीत सलून दुकानदार हे ठेवतील व याचा दैनंदिन गोषवारा तयार करण्यात येईल. सबब सर्व बाबीचा सहानुभूतिपूर्वक विचार करून व सलुन दुकानदारावर उपासमारीची वेळ टाळण्यासाठी आपण लवकरात लवकर सलुन दुकाने उघडण्याची परवानगी देण्यात यावी अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.
निवेदनावर जिल्हाध्यक्ष लक्ष्मण माने, राज्य संघटक किशोर राऊत, जिल्हा सरचिटणीस दाजी आप्पा पवार, जिल्हा उपाध्यक्ष ज्ञानेश्वर पंडीत आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

 
Top