उस्मानाबाद/प्रतिनिधी-
पर राज्यातुन आत्तापर्यंत आलेल्या १८ नागरिकांना जिल्हा परिषद प्रशालेत कोरटाईन करण्यात आले आहे तर त्यातील ४ जणांना होम कोरंटाईन आले आहे तरी यातीलच एका व्यक्तीला १४ दिवसाचा कोरंटाईन कार्यकाल पुर्ण झाल्याने सोडण्यात आले असल्याची माहिती येथे कर्तव्यवर असलेले शिक्षक श्री राऊत यांच्याकडून मिळाली.
उस्मानाबाद तालुक्यातील बेंबळी गांव मोठे असल्याने या गावाला बाहेरून मुंबई-पुणे व अन्य राज्यातुन येणाऱ्या नागरिकांडून कोरोनाचा प्रसार होण्याचा धोका निर्माण झाला आहे. परंतु गावांत पुणे-मुंबई व अन्य राज्यातुन नागरिक येऊन स्वता हून त्यांची माहिती गावातील त्या-त्या प्रभागातील अंगणवाडी कर्मचारी व आशा कार्यकर्तींना  देत नसल्याची माहिती मिळत आहे. हे धोकादायक आहे.
संबंधित व्यक्तीने अशा कार्यकर्ती व अंगणवाडी कर्मचाऱ्याचे ऐकले नाही तर या दोन कर्मचाऱ्यांनी जिल्हा परिषद प्रशालेमध्ये सुरू करण्यात आलेल्या कोरोना सहाय्यता कक्षात असलेल्या कर्मचाऱ्याला माहिती द्यावी. कोरोना  कक्षातील कर्मचारी व डॉक्टर सुरुवातीला त्या व्यक्तीस समजावून सांगतील. तरीही या व्यक्तीने येण्यास नकार दिला तर दक्षता समितीचे अध्यक्ष तथा सरपंच हे पोलिस ठाण्यात तक्रार देतील त्यानंतर संबंधितावर गुन्हा दाखल होईल  तसेच त्याच्या कडून दोन हजार रुपये दंड वसूल  करण्यात येणार आहे या संदर्भात  शासनाने निर्देश दिले आहेत
 
Top