उस्मानाबाद /प्रतिनिधी-
 राज्यात कोरोना संकटाला तोंड देण्यासाठी सर्व यंत्रना आपआपल्या परीने प्रयत्न करीत आहे. राज्यातील स्वस्त धान्य दुकान, पोलीस चेक नाके व आरोग्य परिक्षणासाठी अनेक ठिकाणी जिल्हा परिषद व खाजगी शाळा तसेच महाविद्यालयातील शिक्षक-प्राध्यापकांच्या नियुक्त्या करण्यात आलेल्या आहेत.सामाजिक बांधिलकी म्हणून सर्व शिक्षक बंधुभगीणी शासनाने कोणतेही विमा संरक्षण दिलेले नसतांना आपला जीव धोक्यात घालून योगदान देत आहेत. प्रत्येक शहरामध्ये व गावामध्ये नगरसेवक, सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, पोलीस पाटील, तलाठी, कृषी सहाय्यक, ग्रामसेवक तसेच विविध सामाजिक संघटना कार्यरत आहेत. पोलीस चेक नाक्यावर पोलीस कार्यरत आहेत. व आरोग्य विभागाचे कर्मचारी कार्यरत आहेत. व शासनाने त्यांना विमा संरक्षण सुध्दा पुरविलेले आहे.
दिनांक 01 मे 2020 पासून सर्व शाळा व महाविद्यालयांना सुटया लागलेल्या आहेत. बन्याच शिक्षकांना आपआपल्या गावी, घरी जायचे आहे. अनेकांना ई. 10 वी, ई. 12 वी बोर्डाच्या उत्तरपत्रीका तपासणीची कामे तसेच शासनाने जाहीर केल्याप्रमाणे ई 1 ली ते 9 वी व इ. 11 वी परीक्षेचे निकाल तयार करून संबंधीत विद्यार्थ्यांना निकाल कळवायचा आहे. ही कामे सुध्दा वेळेत पूर्ण करणे गरजेचे आहे. तरी राज्यातील सर्व शिक्षक-प्राध्यापकांना स्वस्त धान्य दुकान, पोलीस चेक नाके व आरोग्य परिक्षण कामातून मुक्त करण्यासाठी संबंधीतांना आदेशित करावे यासाठी मराठवाडा विभागाचे शिक्षक आमदार विक्रम काळे यांनी, राज्याचे मुख्यमंत्री मा. उध्दवजी ठाकरे साहेब, उपमुख्यमंत्री मा. अजितदादा पवार साहेब, गृहमंत्री मा.अनिल देशमुख, शिक्षणमंत्री मा. वर्षा गायकवाड, ग्राम विक
 
Top