उस्मानाबाद / प्रतिनिधी:-
उपविभागीय अधिकारी तथा भूसंपादन अधिकारी कार्यालय,कळंब अंतर्गत खालील तपशीलातील गावाची भूसंपादन प्रक्रिया चालू आहे. राष्ट्रीय महामार्ग अधिनियम 1956 चे कलम 3 (C) (1) अंतर्गत खालील गावातील सुनावणी दि.09 एप्रिल-2020 रोजी घेण्यात येणार होती. मात्र कोविड-19 विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक कार्यवाही म्हणून देशव्यापी लॉकडाऊन करण्यात आले होते.यामुळे दि.09 एप्रिल 2020 रोजीची सुनावणी झाली नाही.
तथापि सद्यस्थितीमध्ये लॉकडाऊनमध्ये जिल्हाधिकारी उस्मानाबाद यांचेकडून सूट जाहिर झालेली असल्यामुळे खालील गावातील संपादीत होणा-या जमिनीबाबत राष्ट्रीय महामार्ग अधिनियम 1956 चे कलम 3 (C) (1) अंतर्गत सुनावणी ठेवण्यात आली त्याचा तपशील खालीलप्रमाणे आहे.
गावाचे नाव व तालुका, सुनावणीची तारीख,सुनावणीची वेळ,सुनावणीची ठिकाण पुढीलप्रमाणे आहे.
1.पानगावता.कळंब,2.येरमाळा ता.कळंब,3.कळंब ता.कळंब. दि.20 मे 2020 वेळ-सकाळी 11.00 वाजल्यापासून ठिकाण-उपविभागीय अधिकारी तथा भूसंपादन अधिकारी कळंब जिल्हा उस्मानाबाद.तरी  सुनावणी उपविभागीय अधिकारी तथा भूसंपादन अधिकारी कार्यालय कळंब येथे होणार आहे,याची सर्व संबंधितांनी नोंद घ्यावी, असे उपविभागीय अधिकारी कळंब यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.
 
Top