उस्मानाबाद /प्रतिनिधी-
संपूर्ण जगात कोरोनाचे अति गंभीर परिणाम जाणवत आहते. आर्थिक संकटाचा सर्वाधिक फटका मजूर, कामगार वर्ग, महिला आणि स्थलांतरितांना बसनार आहे. येणारा काळ आपल्यासमोर मोठी आव्हानं उभी करणार आहे.
 या परिस्थितीला तोंड देण्यासाठी आपण काय केलं पाहिजे ? यावर सर्वच स्तरातून मंथन होणे गरजेचे आहे. महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेच्या मंदिराचे व्यवस्थापन करण्यासाठी श्री.तुळजाभवानी मंदिर संस्थानची स्थापना करण्यात आली आहे.या संस्थानकडे अभियांत्रिकी महाविद्यालय,सैनिकी शाळा यासह मोठ्या प्रमाणात पायाभूत सुविधा उपलब्ध आहेत. हे आपले शक्तीस्थळ असून याच्या माध्यमातून जिल्ह्याचे अर्थकारण मजबूत करण्यासाठी योग्य ती पावले उचलणे आवश्यक आहे.
भविष्यात जागतिक मनुष्यबळाची गरज पूर्ण करण्याची क्षमता भारताकडे असल्याने लक्ष्य केंद्रित कौशल्य विकास महत्त्वाचा आहे . त्याअनुषंगाने संस्थानच्या माध्यमातून व्यावसायिक शिक्षणा सोबत जिल्ह्यातील युवकांना कौशल्य विकास, रोजगाराभिमुख शिक्षण देणे व इतर उपयुक्त उपक्रम राबविणे ही काळाची गरज वाटते.
कोव्हीड १९ च्या महामारीमुळे आपले जिवन पुर्णत: बदललेले आहे. या संकटात देखील संधी आहे, आपल्या भागाचा विकास करण्याची, आपल्या जिल्हयातील मनुष्यबळ अधिक प्रशिक्षीत करूण घेण्याची व उपलब्ध असलेल्या सुविधांचा वापर करण्याची. यासाठी व्यापक रुपरेषा तयार करण्याची आवश्यकता आहे. आपण यात सहभागी झाला तर एक समन्वित अशी रूपरेषा तयार होईल.
आपणांस आवाहन करण्यात येते की, श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान,तुळजापुर च्या माध्यमातून या कामी पुढील काळात जिल्हयातील अर्थव्यवस्था सुदृढ करण्यासाठी कोणते उपक्रम राबवावेत याबाबत आपल्या सुचना ranapatiloffice@gmail.com या मेलवरती पाठवाव्यात, असे आवाहन श्री तुळजाभवानी मंदिर देवस्थान समितीचे विश्वस्त आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी केले आहे

 
Top