उस्मानाबाद(प्रतिनिधी  
वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख आदरणीय मा.अॅड.प्रकाशजी तथा बाळासाहेब आंबेडकर यांचा आज १०मे रोजी ,वाढदिवस आसल्याने व त्यांच्या वाढदिवसावर होणारा खर्च टाळून आज उस्मानाबाद येथील, वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी उस्मानाबाद शहरातील गरिब मजूरांची वस्ती असलेल्या इंदीरा नगर,सांजा रोड,बायपास,उंबरे कोठा ,समर्थ नगर,साठे नगर,परिसरातील गरिब मजूर व निराधार यांना ६५जीवनाआवश्यक किटचे की,ज्यात गहू,तांदुळ,तेल पाॅकेट,साखर,चहापती,तिखट,साबण आशा वस्तुंच्या किटचे वाटप करण्यात आले व त्यांना या संकट काळात घाबरु नका आम्ही आपल्या सोबत आहोत आसा धीर ही देण्यात आला.
या जीवनाआवश्यक किटचे नियोजन भारीप बहुजन महासंघाचे माजी उस्मानाबाद जिल्हाध्यक्ष  तथा वंचित बहुजन आघाडीचे नेते मा.प्रा.डाॅ.सुभाष वाघमारे,  व भारीप बहुजन महासंघाचे माजी उपाध्यक्ष तथा  वंचित बहुजन आघाडीचे मा.बाबासाहेब जानराव ,वंचित बहुजन आघाडीचे युवा कार्यकर्ते सचिन लोखंडे, भारीप बहुजन महासंघाच्या महिला संघटक माजी मा.अनुराधा लोखंडे प्रा.राजा जगताप यांनी केले होते. आज उस्मानाबाद शहरातील वरील वस्तीतील  गरिबांना किटचे वाटप करतांना यांचे बरोबरच हरीभाऊ अणदूरकर,बाळासाहेब अणदूरकर,भाऊसाहेब अणदूरकर उपस्थित होते.
 
Top