उस्मानाबाद /प्रतिनिधी
जिल्ह्यातील 11 प्रलंबित आहवला पैकी 7 व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याने जिल्ह्यात बाधित रुग्णांचा अर्धशतक झाला आहे. 11 प्रलंबित पैकी 2 व्यक्तीचे निगेटिव्ह तर 2 व्यक्तीचे अनिर्णित अहवाल आले आहे.  जिल्हयात आतापर्यंतची कोरोनाग्रस्तांची एकुण  संख्या ५० आहे. त्यापैकी ८ जणांवर उपचार करून घर पाठविले तर सध्या ४२ कोरोना बाधित रूग्णांवपर उपचार सुरू आहेत.
जिल्हा सामान्य रुग्णालय मार्फत दिनांक 26 मे  रोजी लातूर येथील विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेच्या प्रयोगशाळेत पाठविण्यात आलेल्या स्वाब पैकी 11 व्यक्तींच्या स्वाबचे रिपोर्ट प्रलंबित होते. त्या 11 पैकी 7 व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह, 2 निगेटिव्ह व 2 अनिर्णीत आहेत, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर राजाभाऊ गलांडे यांनी दिली आहे.
पॉझिटिव्ह आलेल्या सात व्यक्ती पैकी दोन व्यक्ती ह्या जेवळी मधील पूर्वीच्या पॉझिटिव व्यक्तीच्या संपर्कातील आहेत व ते मुंबई रिटर्न आहेत. तर तुळजापूर तालुक्यातील कारला येथील तीन रुग्ण असून ते मुंबई रिटर्न आहेत. तसेच धुता येतील एक रुग्ण असून तो पूर्वीच्या रुग्णाच्या कॉन्टॅक्ट मधील असून तोही मुंबई रिटर्न आहे. तर एक रुग्ण हा केसर जवळगा येथील असून पूर्वीच्या पॉझिटिव रुग्णाच्या संपर्कातील आहे, अशी माहिती डॉक्टर सतीश आदटराव व जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर गलांडे यांनी दिली आहे.
 
Top