तेर/प्रतिनीधी
उस्मानाबाद तालुक्यातील तेर येथे 26 मे ला पाँझीटील रूग्न सापडल्याने सिल केलेल्या भागात ग्रामपंचायतीच्या वतीने सोडीयम हायड्रो   क्लोराईडची फवारणी तर आरोग्य विभागामार्फत घरोघरी 27 मे ला  सर्व्हे करण्यात आला.
उस्मानाबाद तालुक्यातील तेर येथे पुण्याहून आलेल्या 22 वर्षीय व्यक्तीला कोरोना पाँझीटीवचा अहवाल 26 मे ला आल्यानंतर  प्रशासकीय यंञना खडबडून जागी झाली असून 27 मे ला तेर ग्रामपंचायतीच्या वतीने सिल केलेल्या भागात सोडीयम हायड्रोक्लोराईडची फवारणी करण्यात आली तर आरोग्य विभागाच्या वतीने सिल केलेल्या भागात आरोग्य कर्मचारी,अंगणवाडी कार्यकर्ती,आशा स्वयंसेविका यांच्या वतीने दक्षता म्हणून कोविड कटेंड सर्व्हे करण्यात आला असल्याची माहीती जागजी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या डाँ.नेहा मेनकुदळे यानी दिली.

 
Top