उस्मानाबाद / प्रतिनिधी
शिवसेनेचे पक्षप्रमुख तथा राज्याचे मुख्यमंत्री उध्दवजी ठाकरे, युवासेनेचे प्रमुख तथा पर्यटनमंत्री अदीत्य  ठाकरे 
यांनी अवाहन केल्याप्रमाणे अर्सेनिक अल्बम- 30 या होमियोपॅथिक गोळ्याचा डोस देण्यासाठी   (उस्मानाबाद) जिल्हा शिवसेना पक्षाकडुन सूरुवात करण्यात आली आहे. संपर्कप्रमुख तथा आ. प्रा. तानाजीराव सावंत साहेब व खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम जिल्ह्यामध्ये राबविण्यात येणार असल्याची माहिती शिवसेना जिल्हाप्रमुख तथा आ कैलास घाडगे-पाटील यांनी दिली आहे.*
शिवसेनेच्या धोरणानुसार 80 टक्के समाजकारणाचे संस्कार पक्षामध्ये रुजविण्यात आले आहेत. त्याचाच एक भाग म्हणुन अशा संकटाच्या काळामध्ये नागरीकांच्या बरोबर शिवसेना पक्ष ठामपणे उभा आहे. मुख्यमंत्री उध्दवजी ठाकरे यांच्या संयमी व योग्य निर्णयक्षमतेचा अनुभव सध्या राज्याला पाहायला मिळत आहे. त्यांनी केलेल्या सुचनेनुसार जिल्ह्यामध्ये पहिल्या टप्यात अर्सेनिक अल्बम 30 या गोळ्याचे वितरण पक्षाच्यावतीने करण्यात आले आहे. याचा लाभ सर्वसामान्याबरोबरच जेष्ट नागरीक आणि कमी रोगप्रतिकारशक्ती असलेल्या लोकांना अधिक होणार आहे. कंटेन्मेंट झोन असलेल्या ठिकाणी सर्व नागरीकांना हा डोस दिला जाणार आहे. तर कोरोनाच्या संदर्भात जे लोक थेट फिल्डवर काम करत आहेत, त्यांनाही हा डोस शिवसेना पक्षाच्यावतीने देण्यात येणार आहे.
सध्या जिल्ह्यामध्ये कोरोनाचा कहर वाढत असुन यामध्ये ज्यांची रोगप्रतिकारक शक्ती कमी आहे अशा लोकांना याचा अधिक धोका असल्याचे दिसुन आले आहे. केंद्र सरकारच्या आयुष मंत्रालयाने अर्सेनिक अल्बम -30 या गोळीची शिफारस केलेली आहे. अनेक राज्यामध्ये याचा चांगला परिणाम देखील पाहयला मिळाला आहे. कोरोना पॉझीटिव्ह रुग्ण सोडुन सगळ्यांचा या गोळ्या दिल्या जाऊ शकतात. याऔषधाचे कोणतेही दुष्पारिणाम नाहीत, या गोळ्या लहान मुलापासुन ते वृध्द, गरोदर महिला, मधुमेह, उच्च रक्तदाब आणि इतर आजार असलेल्या व्यक्ती घेऊ शकतात.शिवसेनेच्यावतीने जिल्ह्यातील तब्बल सव्वा दोन लाख लोकांना सहा लाख 75 गोळ्या वितरीत केले जाणार आहेत. कोरोना सहाय्यता कक्षामध्ये कर्तव्यावर असलेले कर्मचारी, शिक्षक, या शिवाय पोलीस, होमगार्ड, आशा कार्यकर्ती, ग्रामसेवकासह जे जे कोरोनाच्या लढाईत फिल्डवर काम करत आहेत अशा सगळ्यांना या गोळ्यांचे वितरण करण्यात येणार आहे. सध्या अनेक गावामध्ये रुग्ण आढळलेले आहेत, अशा सर्वच गावामधील नागरीकांना या गोळ्या दिल्या जाणार आहेत अशी माहिती शिवसेना जिल्हाप्रमुख तथा आ कैलास घाडगे-पाटील यांनी यावेळी दिली.
आज शिराढोण (ता. कळंब) येथे पहिल्या टप्प्यात खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर, शिवसेना जिल्हाप्रमुख तथा कळंब-उस्मानाबाद चे आ. कैलास घाडगे-पाटील यांच्या हस्ते गोळ्या वाटुन या उपक्रमाला सूरुवात करण्यात आली आहे* यावेळी उपविभागीय अधिकारी सौ अहिल्या गाठाळ मॅडम, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. वडगावे, तालुका प्रमुख शिवाजी आप्पा कापसे, जि.प.सदस्य बालाजी (बप्पा) जाधवर, पं. स. सदस्य राजेश्वर पाटील, तलाठी कलढोणे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. जाधव, सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री. जाधव, सरपंच पद्माकर पाटील, डॉ. रमेश जाधवर, डॉ.चोपडे, नासीर पठाण, सुधिर महाजन, उदय माकोडे, डॉ. जोगदंड आदी उपस्थित होते.
 
Top