उस्मानाबाद / प्रतिनिधी
महाराष्ट्र नवनिर्माण सेना जिल्ह्यात एकही शाळा चालू करू देणार नाही तसेच जिल्ह्यात प्राथमिक शिक्षण घेत असलेल्या प्रत्येक विद्यार्थ्याला ५० लाखाचे विमा कवच देण्यात यावे अन्यथा मनसेच्या वतीने शाळेवर हल्ले करून शाळा बंद करण्यात येईल याची नोंद प्रशासनाने व शासनाने घ्यावी , असा इशाराच मनसेचे जिल्हा सचिव दादा कांबळे यांनी दिला आहे.
तत्पुवी मनसे जिल्हा सचिव कांबळे हे उद्या सोमवार दि. १ जून २०२० रोजी सकाळी १० वाजता आपल्या मागण्याचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देणार आहेत. निवेदन देऊन ही जर मागण्या मान्य नाही झाल्या तर हे आंदोलन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने उस्मानाबाद जिल्हा सचिव दादा कांबळे यांच्या नेतृत्वखाली होणार असल्याची माहिती त्यांनी आमच्या प्रतिनिधी बोलताना दिली.  
 
Top