उस्मानाबाद / प्रतिनिधी
 येथील आदर्श शिक्षण प्रसारक मंडळ संचलित श्रीपतराव भोसले हायस्कूल चे प्राचार्य श्रीयुत पडवळ एस. एस .व गणित विषयाचे अध्यापक श्री. घोरपडे एस. बी. हे आज रविवार दिनांक 31 मे 2020 रोजी आपल्या 34 वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर निवृत्त झाले. त्यानिमित्त आदर्श शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष सन्माननीय सुधीर  पाटील यांच्या हस्ते  सत्कार करण्यात आला.
सेवानिवृत्तीच्या सत्कार प्रसंगी बोलताना संस्थेचे अध्यक्ष माननीय सुधीर  पाटील यांनी सांगितले की, “ श्री पडवळ एस. एस. यांचा सहा वर्षाच्या प्राचार्य पदाचा कार्यकाल हा शाळेच्या लौकिकात भर टाकणारा ठरला. त्यांच्या काळामध्ये महाराष्ट्रात दहावी बोर्डाच्या परीक्षेत भोसले हायस्कूलचा विद्यार्थी राज्यात सलग दोन वेळा पहिला आला .महाराष्ट्रा मधील सर्वात जास्त विद्यार्थी संख्या असलेली मराठी शाळा  म्हणून श्रीपतराव भोसले हायस्कूल या प्रशाले चा लौकिक झाला, हे सांगून त्यांच्या पुढील आयुष्याला आरोग्यदायी शुभेच्छा दिल्या तसेच गणित विषयाचे अध्यापक श्री .घोरपडे एस .बी.सर व जुनोनी येथील पांडुरंग विद्यालयाचे अध्यापक कराळे सर यांना सेवानिवृत्ती बद्दल . या प्रसंगी सत्कारमूर्ती पडवळ सरांनी 34 वर्षाच्या कृतार्थ सेवेबद्दल शाळा आणि संस्थे विषयी कृतज्ञता व्यक्त केली .
 याप्रसंगी आदर्श शिक्षण प्रसारक मंडळाचे प्रशासकीय अधिकारी श्री. आदित्य पाटील  उपप्रशासकीय अधिकारी संतोष घार्गे , उप मुख्याध्यापक श्री. सिद्धेश्वर कोळी, युवा नेते अभिराम पाटील, कार्यालयीन अधिक्षक बालाजी घोलप, वित्त अधिकारी कुलकर्णी संतोष संस्थेतील सर्व शाखांचे प्राचार्य, सर्व पर्यवेक्षक, विभाग प्रमुख, शिक्षकेतर कर्मचारी  सुरक्षित अंतर  पाळत उपस्थित होते.
 
Top