तुळजापूर/प्रतिनिधी -
 जिल्हयातील किराणा दुकाने इतर आस्थापने व दारु दुकाने चालु करण्यासाठी आदेशाचा पुर्नविचार करण्याची मागणी मनसे चे प्रशांत नवगिरे यांनी जिल्हाधिकारी यांच्या कडे निवेदन देवुन केली आहे.
जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात म्हटलं आहेकी, एक दिवसा आड ठराविक वेळे साठी दुकाने आस्थापने चालु ठेवण्याचा निर्णयामुळे ऐकाच वेळी बाजार पेठेत  प्रचंड गर्दी होत असुन खरेदी साठी घराबाहेर पडलेल्या नागरिकांची मोठी कुंचबना होवुन नागरिकांना ञास होत आहे. नागरिकांना दैनंदिन वस्तु लागतात जेव्हा  जिल्हा ग्रीन झोन मध्ये नसताना दुकाने दररोज उघडे असत आता ग्रीन झोन मध्ये येवुन ही आठवड्यातुन तीन दिवस काही काळा करिता उघडी ठेवण्याचा आदेश दिल्याने यामुळे नागरिक ऐकदम मोठ्या संखेने बाहेर येवुन खरेदी करीत असल्याने त्यांना या कमी कालावधीचा  ञास होत आहे.दररोज ठराविक वेळेत दुकाने आस्थापने  उघडे ठेवल्यास  यामुळे ऐकच वेळी गर्दी होणार नाही  दररोज दुकाने उघडे राहत असल्याने लोक ही गर्दी करणार नाहीत गर्दी टाळायाची असेल तर दररोज दुकाने उघडे ठेवणे गरजेचे आहे.
दारु विक्री बंद आदेश असल्याने दारु पिणारे लोक जादा दराने  सध्या गल्ली बोळात राजरोस दारु विक्री होणारी दारु विकत घेवुन पित आहेत या बाबतीत आपण आपल्या काही अधिकाऱ्यांन मार्फत गुप्त चौकशी केल्यास   गल्ली बोळात मोठ्या प्रमाणात चोरुन गावठि दारु विकत असल्याचे निदर्शनास येईल  यामुळे  शाषाणाचा महसुल मोठ्या प्रमाणात बुडत आहे तरी वाईन शाँपचे कांऊंटर वाढवुन महसुल वाडी करता कोविड 19च्या सर्व नियमांचे पालन करुन  सोशल डिस्टंन्सचे पालन करण्याचे आदेश देवुन दारु विक्री दुकाने उघाडण्यास  परवानगी द्यावी, असे निवेदनात म्हटल आहे.
 
Top