येरमाळा/प्रतिनिधी-
सोलापूर जिल्ह्यात वाढत्या कोविड-19 रूग्णसंखख्येच्या पार्श्वभूमीवर उस्मानाबाद जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात दक्षता घेतली जात आहे. कोरोनामुक्त जिल्ह्यात पुन्हा कोरोनाचा शिरकाव होऊ नये यासाठी येरमाळा पोलिस व यश मेडिकल फाऊंडेशनच्या संयुक्त विद्यमाने सोलापूर-उस्मानाबाद जिल्हा सरहद्दीवर थर्मल स्क्रीनिंग केले जात आहे.
सोलापूर, पुणे या जिल्ह्यातून उस्मानाबाद जिल्ह्यात येणार्‍या वाहनांतील प्रवाशांची ट्रॅव्हल हिस्ट्री, संशयित लक्षणे व थर्मल स्क्रीनिंग केली जात आहे. तसेच अतिबाधित क्षेत्रातून आलेल्या व्यक्तींना उपाययोजना व खबरदारीच्या सूचना दिल्या जात आहेत. मंगळवारी दिवसभरात साधारणतः 48 व्यक्तींचे थर्मल स्क्रीनिंग करण्यात आले. उस्मानाबाद जिल्ह्यातील तीन व बाहेर उपचार घेत असलेल्या उस्मानाबाद येथील रूग्ण अशा चौघांचे तपासणी अहवाल निगेटिव्ह आल्यानंतर उस्मानाबादचा कोरोनामुक्त जिल्ह्यांच्या यादीत समावेश झाला आहे. परंतु शेजारील जिल्ह्यामध्ये वाढत चाललेली कोविड-19 पॉझिटिव्ह रूग्णांची संख्या पाहता आपण खबरदारी घेणे गरजेचे आहे. म्हणून ही मोहीम सुरू केल्याचे यश मेडिकल फाऊंडेशनचे संचालक डॉ. संदीप तांबारे यांनी सांगितले.

 
Top