उस्मानाबाद / प्रतिनिधी-
 जिल्ह्यातील सर्व विद्यार्थी, पालक, शिक्षक यांनी लॉक डाऊन (बंद) च्या काळात आपला, आपल्या पाल्याचा, विद्यार्थ्यांचा अभ्यास थांबू नये. यासाठी आपण आपल्या केंद्रात कार्यरत विशेष शिक्षक, विशेषतज्ञ, थेरेपिस्ट, सायकोलॉजीस्ट यांच्याशी संपर्क साधावा किंवा अधिक माहितीसाठी जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, उस्मानाबाद यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन, प्राचार्य, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य डॉ. इब्राहीम नदाफ यांनी केले आहे.
     बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम 2009 व RPWD Act 2016 अन्वये बालकांमध्ये कोणताही भेद न करता प्रत्येक विशेष गरजा असणाऱ्या बालकांना वयाची 18 वर्षापर्यंत सुयोग्य व संचार मुक्त वातावरणात नियमित विद्यार्थ्यासोबत शिक्षणाची समान संधी देऊन मुख्य प्रवाहात आणणे व त्यांचे गुणवत्ता पूर्ण शिक्षण पूर्ण करणे बंधनकारक आहे.  या अनुषंगाने समावेशित शिक्षण उपक्रमांतर्गत कार्यरत विशेष शिक्षक, विशेषतज्ञ, शाळा, केंद्र व तालुका स्तरावर प्रत्यक्ष भेटी देऊन विशेष गरजा असणाऱ्या बालकांचा शोध घेणे. प्रवेश पात्र बालकांना प्रवेश मिळून देणे, गरजेनुरुप शैक्षणिक साह्यभूत सेवा सुविधा उपकरणे उपलब्ध करून देणे, शिबिरांचे आयोजन करणे, बालकांच्या शिक्षणाविषयी येणारी आव्हाने कमी करण्यासाठी पालकांना , शिक्षकांना विविध प्रशिक्षण देणे, मार्गदर्शन व समुपदेशन करणे, नवीन प्रवेशीत होणाऱ्या बालकांना शाळा पूर्व कौशल्य प्रशिक्षण देणे, अतितीव्र दिव्यांग बालकांना गृह मार्गदर्शन शिक्षण देणे, थेरपी सेवा देणे असे विविध कार्य करतात, सध्या जिल्ह्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी खबरदारी म्हणून लॉकडाऊन करण्यात आले आहे. या परिस्थितीचा परिणाम विशेष गरजा असणाऱ्या बालकांचे शिक्षणावर होऊ नये, यासाठी जिल्ह्यातील कार्यरत 41 विशेष शिक्षक, 16 विशेषतज्ञ, थेरेपिस्ट, सायकोलॉजीस्ट यांच्यामार्फत लॉकडाऊन कालावधीत वर्क फ्रॉम होम या कार्यपद्धतीने विशेष गरजा असणाऱ्या बालकांसाठी समावेशित शिक्षण उपक्रमाची
अंमलबजावणी करण्यासाठी नवीन प्रवेशित होणाऱ्या दिव्यांग बालकांची शाळा पूर्व तयारी कार्यक्रम, अति तीव्र दिव्यांग बालकांसाठी गृह पायाशिक्षण कार्यक्रम, School From Home कार्यक्रम, Therapy from Home उपक्रम, प्रश्न तुमचा उत्तर आमचे उपक्रम (शिक्षकांसाठी), अनुकुलित प्रश्न पत्रिका संच तयार करणे आणि पालक, शिक्षक यांचा
व्हॉटस्अप ग्रुप तयार करुन त्याद्वारे सर्व विद्यार्थी व पालकांना मार्गदर्शनपर सूचना देण्यात आलेल्या आहेत. यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. संजय कोलते यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य डॉ. इब्राहीम नदाफ यांच्या अध्यक्षतेखाली, समता विभाग प्रमुख सय्यद अख्तर, अधिव्याख्याता बिराप्पा शिंदे, जिल्हा समन्वयक समावेशित शिक्षण संदीप वाघ, महादेव सोनवणे यांनी दिनांक 27 एप्रिल 2020 रोजी सकाळी 11.00 जिल्ह्यातील सर्व कार्यरत विशेष शिक्षक, विशेषतज्ञ, थेरेपिस्ट, सायकोलॉजीस्ट यांची झूमॲपद्वारे बैठक घेण्यात आली. ही बैठक यशस्वी करण्यासाठी आय.टी. विभागाचे विषय सहाय्यक तानाजी खंडागळे यांनी प्रयत्न केले आहे .
 
Top