उस्मानाबाद / प्रतिनिधी-
 महाराष्ट्र शासनाने लॉकडाऊनचा कालावधी दि. 30 एप्रिल 2020 पर्यंत वाढविला आहे. तसेच भारत सरकारने कोव्हिड 19 या विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संपूर्ण देशात लॉकडाऊनचा कालावधी दिनांक 3 मे, 2020 पर्यंत वाढविला आहे. कोरोना विषाणूचा (COVID-19) प्रादुर्भाव होऊ नये यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून लॉकडाऊनचे कालावधीत उस्मानाबाद जिल्ह्यातील सर्व सरकारी, सहकारी व खाजगी बँका, पतसंस्थामध्ये तसेच उस्मानाबाद जिल्ह्यातील सर्व पोस्ट कार्यालयांमध्ये करावयाच्या कार्यवाहीबाबत आदेश पारित केले आहेत.             
बँका व त्यांची ग्राहक सेवा केंद्रे, पोस्ट कार्यालयांची बँकींग सेवा (AePS/ Doorstep Banking Services, The post office Saving Bank & India Post Payment Bank) यामध्ये पैसे काढणे व इतर व्यवहारासाठी बायोमेट्रीक यंत्रणेचा वापर केला जात असल्याने  बायोमेट्रीक यंत्रणेचा वापर करण्यास परवानगी दिल्यास नागरिकांना बँकांमधून व त्यांच्या ग्राहक सेवा केंद्रांमधून तसेच पोस्ट कार्यालयांच्या बँकींग सेवा (AePS/Doorstep Banking Services, The post office Saving Bank & India Post Payment Bank) चा वापर करुन पैसे काढता येतील व त्यामुळे बँकांमध्ये व पोस्ट कार्यालयांमध्ये होणारी नागरिकांची गर्दी कमी होण्यास मदत होईल. 
जिल्हाधिकारी दिपा मुधोळ-मुंडे यांना प्राप्त झालेल्या अधिकारांनुसार कोरोना विषाणूचा (COVID-19) होणारा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधक उपाययोजनेचा एक भाग म्हणून उस्मानाबाद जिल्ह्यामधील सर्व सरकारी बँका व त्यांची ग्राहक सेवा केंद्रे, सहकारी व खाजगी बँका, पतसंस्था तसेच पोस्ट कार्यालयांची बँकींग सेवा (AePS/Doorstep Banking Services, The post office Saving Bank & India Post Payment Bank) यांना लॉकडाऊन कालावधीत बायोमेट्रीक यंत्रणेचा वापर करणेस खालील अटी व शर्तींच्या आधारे परवानगी देत आहे.
कोरोना विषाणूचा (COVID-19) प्रादुर्भाव होणार नाही या अनुषंगाने बायोमेट्रीक प्रणालीचा वापर करुन बँकींग व्यवहार करीत असताना भारत सरकार, महाराष्ट्र शासन व आरोग्य विभागाकडून वेळोवेळी देण्यात येणाऱ्या सूचनांचे पालन करणे बंधनकारक राहील.
बँक व डाक विभागातील कर्मचाऱ्यांना मास्क, ग्लोव्हज, सॅनिटायझर, कागद, कापूस, पेपरबॅग इ. साहित्य पुरेशा प्रमाणात उपलब्ध करुन देण्यात यावे.  बायोमेट्रीक डिव्हाईस, दरवाज्याचे हॅण्डल्स, नोब्स, टेबल, खुर्ची इत्याचीचे सातत्याने निर्जंतुकीकरण (Sanitization) करत रहावे.बँकींग, डाक विभागातील कर्मचाऱ्यांनी नियमितपणे सॅनिटायझरचा वापर करावा तसेच साबणाने हात स्वच्छ धुवावेत.कर्मचाऱ्यांनी काम करताना डोळे, नाक व तोंडाला स्पर्श करणे टाळावे.बँकेत, डाक विभागात येणाऱ्या  ग्राहकांना बायोमेट्रीक उपकरणाचा वापर करण्यापूर्वी व वापर केल्यानंतर साबणाने स्वच्छ हात धुण्यासाठी प्रेरित करावे व त्यासाठी ग्राहकांना साबण व पाणी उपलब्ध करुन देण्यात यावे.प्रत्येक AePS व्यवहार करताना बायोमेट्रीक उपकरणाचा वापर करण्यापूर्वी व वापर केल्यानंतर त्याचे निर्जंतुकीकरण (Sanitize) करण्यात यावे.बायोमेट्रीक उपकरण निर्जंतूक (Sanitize) करताना वापरलेला कापसाचा बोळा पेपर कव्हरमध्ये ठेवण्यात यावा आणि तो काळजीपूर्वक व पुरेशी दक्षता घेऊन नष्ट करण्यात यावा.ग्राहकांना कुटुंबातील सदस्यांसह किंवा मित्रांसह समुदायाने बँकेत, डाक विभागात येऊ नये व जमावबंदी आदेशाचे उल्लंघन करु नये अशी सूचना देण्यात यावी.
बँकेतील, डाक विभागातील दोन कक्षांमधील अंतर किमान 2 मिटर राहील याबाबत दक्षता घ्यावी.  ग्राहकांना त्यांचे नाक व तोंडावर मास्क, स्वच्छ रुमाल बांधणेबाबत सक्ती करावी तसेच रांगेत उभ्या असलेल्या ग्राहकांमध्ये पुरेसे सामाजिक अंतर राहील यादृष्टीने मार्कींग करण्यात यावी. आवश्यकता असल्यास पोलीसांची मदत घेण्यात यावी.ग्राहकांनी  सामाजिक अंतर ठेवणेबाबत India Post Payment Bank ने दिलेल्या मार्गदर्शक सूचना ग्राहकांच्या सोईसाठी प्रदर्शित करण्यात याव्यात. तसेच बँकांनीदेखील ग्राहकांच्या सोईसाठी मार्गदर्शक सूचना प्रसिद्ध करण्यात याव्यात.सर्दी, ताप व श्वासोच्छवास घेण्यास त्रास होत असलेल्या कर्मचाऱ्यांना तात्काळ जवळच्या शासकीय रुग्णालयात भरती करण्यात यावे. ग्राहकांनी अत्यावश्यक काम असेल तरच बँकेच्या, पोस्टाच्या शाखेमध्ये यावे.
दिनांक 3 मे, 2020 पर्यंत बँकांनी, पोस्टाने फक्त रोख भरणा करणा व काढणे ही दोन कामे प्राधान्याने करावी. त्याकरिता बँकांनी, पोस्टाने आपले पुरेसे कर्मचारी सदर कामासाठी  नेमावे. जेणेकरुन ग्राहकांना शाखेमध्ये कमीत कमी वेळ व्यतीत करता येईल.   
बँकांनी, पोस्टाने एका वेळेस जास्तीत जास्त तीन-चार ग्राहकांना शाखेमध्ये येण्यास परवानगी द्यावी.  प्रवेश केलेल्या ग्राहकांचे काम झाल्याशिवाय पुढील ग्राहकांना बँकेत, पोस्टात आतमध्ये येण्यास परवानगी देऊ नये. दोन ग्राहकांमध्ये रांगेत पाच फूट अंतर ठेवावे.
सर्व ग्राहकांनी बँकेच्या, पोस्टाच्या इतर वितरण पर्यायांचा (एडीसी) म्हणजेच इंटरनेट बँकींग, मोबाईल बँकींग व युपीआय, एटीएम, कॅश डिपॉझीट मशीन इत्यादी सुविधांचा जास्तीत जास्त वापर करावा. ग्राहकांनी बँकेच्या काऊंटर पासून 3 ते 5 फुटाचे अंतर ठेवावे. 60 वर्षांवरील ग्राहकांनी आपल्या बँक, पोस्ट खात्यावरील  व्यवहारांसाठी दि. 3 मे, 2020 पर्यंत शक्यतो बँक शाखेस प्रत्यक्ष भेट देऊ नये.विविध योजनांमधून लाभार्थ्यांच्या खात्यावरील जमा रक्कम त्यांच्या खात्यात सुरक्षित राहते तसेच सदरची रक्कम केव्हाही  काढता येते, त्यामुळे नागरिकांनी घाबरुन न जाता पैसे काढण्यासाठी बँकेत गर्दी करु नये असे सूचना फलक बँकेबाहेर लावावे. 
या आदेशाची तात्काळ अंमलबजावणी करण्याची जबाबदारी अधीक्षक, पोस्ट ऑफीसेस उस्मानाबाद विभाग मुख्यालय लातूर, जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, उस्मानाबाद व प्रबंधक, जिल्हा अग्रणी बँक, उस्मानाबाद, व्यवस्थापकीय संचालक, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, उस्मानाबाद यांची राहील.सदर आदेशाचे उल्लंघन करणारी व्यक्ती, संस्था अथवा संघटना उपरोक्त वाचा क्र. 2 मधील “महाराष्ट्र कोव्हीड 19 उपाययोजना नियम, 2020” चे नियम 11 नुसार, भारतीय दंड संहिता (45 ऑफ 1860) कलम 188 मधील तरतुदींनुसार दंडनीय, कायदेशीर कारवाईस पात्र राहील. हे आदेश दि. 03 मे 2020 पर्यंत लागू राहतील.
 
Top